• Download App
    तालिबानकडून आश्वासनांना हरताळ, अफगाण सैनिकांची दिवसाढवळ्या हत्या । Taliban killed afgahan solders

    तालिबानकडून आश्वासनांना हरताळ, अफगाण सैनिकांची दिवसाढवळ्या हत्या

    वृत्तसंस्था

    जीनिव्हा : सत्ता मिळाल्यानंतरही तालिबानी दहशतवादी अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांत काम केलेल्या सैनिकांची सूड म्हणून हत्या करत असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या प्रमुख मिशेल बॅशलेट यांनी केला आहे. Taliban killed afgahan solders

    बॅशलेट म्हणाल्या की, तालिबानच्या उक्ती आणि कृतीत फरक आहे. तालिबानची सत्ता आल्याने अफगाणिस्तानची अवस्था आणखी बिकट झाली आहे. अफगाणिस्तानमधील आधीच्या सरकारसाठी आणि अमेरिकेसाठी काम केलेल्यांवर तालिबानचा राग असून घरोघर जाऊन अशा व्यक्तींचा घरोघर जाऊन शोध घेतला जात आहे.



    माजी सैनिकांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना पकडून नेले जात आहे. काही वेळा त्यांना सोडून दिले जाते, तर काही वेळा हे लोक मृतावस्थेत आढळून येतात.

    पाच ते सहा शहरांमध्ये तालिबानी दहशतवाद्यांची ही शोधमोहिम सुरु असल्याचा दावाही बॅशलेट यांनी केला. काही स्वयंसेवी संस्थांच्या कार्यालयांवरही तालिबान्यांनी छापे टाकले असल्याचा आरोप त्यांनी केला.

    Taliban killed afgahan solders

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad : रात्रीच्या पार्ट्यांमध्ये जाऊ नका, रेप-गँगरेप होऊ शकतो; अहमदाबादमध्ये वाहतूक पोलिसांनी लावले वादग्रस्त पोस्टर्स, टीकेनंतर हटवले

    राहुल गांधी आणि तेजस्वी यादवांनी आरोपांचे हिट अँड रन केले; पण निवडणूक आयोगाने बरोबर कायद्याच्या कचाट्यात अडकवले!!

    राहुल गांधी म्हणजे पावसाळ्यातला बेडूक, फक्त निवडणुका आल्या की बिहारमध्ये येतात; प्रशांत किशोर यांचे शरसंधान!!