• Download App
    अफगाणिस्तानात तालिबानी राक्षसी राजवट; भारतीय नेटिझन्सच्या टार्गेटवर माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी... पण का...??|Taliban in Afghanistan; Mohammed Hamid Ansari is on the target in social media... But why??

    अफगाणिस्तानात तालिबानी राक्षसी राजवट; भारतीय नेटिझन्सच्या टार्गेटवर माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी… पण का…??

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्लामी दहशतवादाचा राक्षस तालिबानच्या रूपाने थैमान घालत असताना हिंदुत्वाचा खोटा बागुलबुवा उभा करत त्याची जगाला भीती घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदा लिबरल्स आणि आंतरराष्ट्रीय तथाकथित विद्वान आयोजित करीत असले तरी, भारतात मात्र सोशल मीडिया वरून तालिबान आणि तिच्या राजवटीततल्या धोक्यांवर गंभीर चर्चा सुरू झाली आहे.Taliban in Afghanistan; Mohammed Hamid Ansari is on the target in social media… But why??

    तालिबानने कितीही आपली इथून पुढची राजवट सौम्य असल्याची घोषणा केली असली तरी कोणाचाही तालिबानवर विश्वास नाही. उलट तालिबानच्या राक्षसी राजवटीची वर्णने करणारे व्हिडिओ, मीन्स, लेख, बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत.



    भारतात माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी तालिबान राजवटीच्या निमित्ताने सोशल मीडियात टार्गेटवर आले आहेत. त्यांनी 2018 मध्ये भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे शरिया मध्ये रूपांतर करावे, अशी सूचना केली होती. ते अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू राहिले आहेत. उपराष्ट्रपतीपदी असताना मोदी सरकारवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर टीका करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नव्हती.

    त्याचबरोबर उपराष्ट्रपती पदावरून पायउतार होताना देखील त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. भारत हा अल्पसंख्यांकांसाठी म्हणजे मुसलमानांसाठी धोकादायक देश बनला आहे. मुसलमान समाज सहिष्णुतेचा बळी ठरतो आहे, असा धोशा त्यांनी लावला होता. याच मुद्द्यावरून आता सोशल मीडियात मोहम्मद हमीद अन्सारी हे नेटिझन्स च्या टार्गेटवर आले आहेत.

    अफगाणिस्तानात धर्मांधांची तालिबानी राजवट आली तरी हमीद अन्सारी यांना तो देश धोकादायक वाटत नाही का?, असा खडा सवाल आता नेटिझन्स सोशल मीडियावर विचारताना दिसत आहेत.

    भारतीय मुसलमानांचे धार्मिक आणि वैयक्तिक वाद सोडवण्यासाठी शरिया कायद्यानुसार न्यायालय स्थापण्याची सूचना हमीद अन्सारी यांनी केली होती. आता अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यानंतर तेथे शरिया न्यायालये स्थापन होणार आहेत. मग हमीद अन्सारी अफगाणिस्तानात जातील का?, असा खोचक सवाल नेटिझन्सनी केला आहे.

    या खेरीज सोशल मीडियावरून तालिबानच्या जुन्या राजवटीतले काही व्हिडिओ, छायाचित्रे प्रसृत करण्यात येत आहेत. त्यात महिलांवर होणारे अत्याचार, महिलांना सार्वजनिक ठिकाणी छडीने मारणे वगैरे व्हिडिओ आहेत. तालिबानने महिलांना हिजाबची सक्ती केली आहे. याकडे नेटिझन्स आवर्जून लक्ष वेधत आहेत.

    तालिबानवर भारतीय मुसलमानांचा देखील विश्वास नाही तरीदेखील लिबरल्स आणि मोहम्मद हमीद अन्सारी यांच्यासारखे मुस्लिम विद्वान आणि उच्चपद भोगणारे नेते गप्प बसले आहेत, यावर नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे.

    Taliban in Afghanistan; Mohammed Hamid Ansari is on the target in social media… But why??

    विशेष प्रतिनिधी

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य