विशेष प्रतिनिधी
काबुल – तालिबानने हल्ले करत इसिसचे काही ठिकाणं उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात इसिसचे अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. काल मशिदीच्या प्रवेशद्वारावर झालेल्या बॉम्बस्फोटात किमान पाच नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा बदला म्हणून तालिबानने इसिसवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.Taliban attacks on ISIS
तालिबानने म्हटले की, काबूल शहरातील एका मशिदीबाहेर स्फोट झाल्यानंतर काही वेळातच तालिबानच्या दहशतवाद्यांनी शहरातीलच इसिसच्या ठिकाणांवर हल्ले केले. यावेळी तालिबानचे इसिसचे एक तळ संपूर्णपणे नष्ट केले. उत्तर काबूलमधील खैर खानाच्या जवळच इसिसच्या एका तळावर कारवाई करण्यात आली.
तालिबानच्या हल्ल्यात इसिसचे किती दहशतवादी ठार झाले आणि तालिबानचे किती दहशतवादी जखमी झाले, हे मात्र समजू शकले नाही. दरम्यान, कालच्या स्फोटप्रकरणी तीन संशयितांना अटक केल्याचे प्रवक्ता बिलाल करिमी याने म्हटले आहे.
Taliban attacks on ISIS
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र सरकारचा जमीनाचा रेट १६ कोटीरुपये, ऐवढा रेट असेल तर मी कुठून रस्ते बांधणार, नितीन गडकरी यांचा सवाल
- ओमर अब्दुल्ला यांनी उत्तर प्रदेशची तुलना केली जम्मू-काश्मीरशी, संतप्त नेटकरी म्हणाले येथे इथे धर्मांतर न केल्यास कोणालाही बळजबरीने राज्य सोडण्याची वेळ येत नाही
- अशोक चव्हाण यांना काळे झेंडे दाखविले म्हणून शिवसैनिकांना पोलीसांनी तुडवले, व्यथित होऊन शिवसेना सोडल्याचा सुभाष साबणे यांचा दावा
- दुर्गम भागात लस पोहोचविण्यासाठी प्रथमच ड्रोनचा वापर, २६ किलोमीटरचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत