• Download App
    Asim Munir ट्रम्पच्या नोबेल फुग्याला लाडक्या असीम मुनीरची टाचणी; अमेरिकेतून भारताच्या बरोबर अर्ध्या जगाला अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी!!

    ट्रम्पच्या नोबेल फुग्याला लाडक्या असीम मुनीरची टाचणी; अमेरिकेतून भारताच्या बरोबर अर्ध्या जगाला अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी!!

    नाशिक : डोनाल्ड ट्रम्पने फुगवलेल्या नोबेल फुग्याला लाडक्या असीम मुनीरची टाचणी; अमेरिकेतून भारताच्या बरोबर जगाला दिली अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी!!, असला प्रकार अमेरिकेतून समोर आला. Asim Munir

    भारत आणि पाकिस्तान यांच्यातले मोठे युद्ध मी टाळले. दोन्ही देशांमध्ये मी मध्यस्थी केली, असा दावा करून नोबेल शांतता पुरस्कारासाठी हात पसरून बसलेल्या डोनाल्ड ट्रम्पच्या नोबेल पुरस्काराच्या फुग्याला त्यांच्या लाडक्या असीम मुनीर यानेच टाचणी लावली. ती सुद्धा पाकिस्तानातून नव्हे, तर डोनाल्ड ट्रम्पच्या अमेरिकेत जाऊन!! असीम मुनीर अमेरिकेच्या निमंत्रणावरून एकाच महिन्यात दुसऱ्यांदा अमेरिकेत गेला. आधीच्या दौऱ्यात तो डोनाल्ड ट्रम्प बरोबर diplomatic lunch जेवला. ट्रम्प बरोबर त्याने मोठमोठ्या बाता मारल्या. त्याच्याच बरोबर diplomatic lunch जेवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्पने पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेत बोलावले. पण ट्रम्प आणि मुनीरचा डाव ओळखून मोदी ते diplomatic lunch जेवायला गेले नाहीत. त्यामुळे ट्रम्प आणि मुनीर‌ या दोघांनाच white house मधले diplomatic lunch जेवावे लागले. त्या lunch मधून भारताला आणि मोदींना काही “खिलवता” आले नाही.



    पण तरी डोनाल्ड ट्रम्प यांचे असीम मुनीर प्रेम घटले नाही. त्यांनी महिनाभराच्या आत त्याला पुन्हा अमेरिका दौऱ्यावर बोलविले. पण असीम मुनीर याने अमेरिकेत जाऊनच डोनाल्ड ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्काराच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग लावणारे भाषण ठोकले. त्याने टेम्पामध्ये भाषण करताना भारताबरोबरच अर्ध्या जगाला अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी दिली. पाकिस्तानची बढाई मारताना आपण अमेरिकेत आहोत आणि ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा आहे, याचे भान असीम मुनीर पुरता विसरून गेला.

    भारत आणि पाकिस्तान यांची तुलना त्याने “मर्सिडीज कार” आणि “खडखडणारा ट्रक” अशा शब्दांनी केली. भारताची प्रगती मर्सिडीज कार सारखी सुरू आहे. भारत एखाद्या मर्सिडीज कार प्रमाणे रस्त्यावर धावतो आहे, पण पाकिस्तान हा खडखडणारा ट्रक आहे. खडखडणारा ट्रक जर मर्सिडीज कारला धडकला, तर काय परिणाम होतो?, असा खुळचट सवाल असीम मुनीर याने केला. भारताकडून पाकिस्तानला अस्तित्वाचा धोका आहे आणि पाकिस्तान अस्तित्वाच्या धोक्यात असेल, तर आपली अण्वस्त्रे वापरेल. भारताशी युद्ध करताना पाकिस्तान बुडणार असेल, तर आम्ही अर्धे जग घेऊन बुडू, अशी धमकी असीम मुनीर याने दिली. सिंधू नदीचे पाणी ही भारताची प्रॉपर्टी नाही. भारताने सिंधू नदीवर धरणे बांधले तर पाकिस्तान 10 मिसाईल डागून ती धरणे उद्ध्वस्त करेल, अशी दमबाजी सुद्धा असीम मुनीर याने केली.

    ज्या असीम मुनीरला डोनाल्ड ट्रम्पने खांद्यावर उचलून घेतले, त्याच असीम मुनीरने ट्रम्पच्याच कानात ** केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध मी थांबविले म्हणून मला नोबेल पुरस्कार द्या, असे म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्पच्या अमेरिकेत जाऊन असीम मुनीर याने ट्रम्पच्या नोबेल फुग्याला टाचणी लावली.

    Take Half World Down With Us”: Pak Army Chief Asim Munir’s Nuclear Threat In US

    Related posts

    Manisha Kayande : जैन मुनींच्या इशाऱ्याल मनीषा कायंदेंचे प्रत्युत्तर- ज्यांना कबुतरे आवडतात, त्यांनी ती घरी पाळावीत; सार्वजनिक ठिकाणी त्रास नको!

    Jain Monk : कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन मुनींचा आंदोलनाचा इशारा; म्हणाले – धर्माविरोधात जाल, तर कोर्टालाही मानणार नाही

    India Tariffs : अमेरिकेवर रेसिप्रोकल टॅरिफ लादण्याची भारताची तयारी; काही US प्रॉडक्ट्सवर 50% पर्यंत लावण्याची शक्यता