• Download App
    हेअरस्टायलिस्ट जावेद हबिब यांच्यावर कारवाई करा, राष्ट्रीय महिला आयोगाचे आदेश|take action against hairstylist Javed Habib, orders of National Commission for Women

    हेअरस्टायलिस्ट जावेद हबिब यांच्यावर कारवाई करा, राष्ट्रीय महिला आयोगाचे आदेश

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : हेअरस्टायलिस्ट जावेद हबिब यांच्यावर कारवाई तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केली आहे. केलेल्या कारवाईबाबत महिला आयोगाला कळविण्यात यावे असेही म्हटले आहे.Take action against hairstylist Javed Habib, orders of National Commission for Women

    उत्तर प्रदेशातील एका वर्कशॉपमध्ये जावेद हबिब एका महिलेचे केस कापताना दिसतात. जावेद हबिब त्या महिलेच्या केसावर थुंकताना दिसून येतात आणि म्हणतात, जर तुमच्याकडे पाणी नसेल तर थुंकी तुमच्या मदतीला येऊ शकते. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.



    राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी यासंदर्भात उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहलंय. त्यांनी म्हटलंय की, या व्हिडीओची दखल घेत तातडीने जावेद हबिब यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच केलेल्या कारवाईबाबत महिला आयोगाला पुन्हा कळवण्यात यावं. ही माहिती महिला आयोगाने ट्विट करत दिली आहे.

    ३ जानेवारीला एका शोमध्ये हबीब यांनी केसांची देखभाल आणि शॅम्पूचे महत्त्व सांगून पूजा गुप्ताच्या केसात थुंकले होते. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महिलेच्या केसात थुंकल्यानंतर जावेद हबीब या थुंकीत जीव असल्याचे सांगत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

    ही महिला बागपतमधील बरौतची रहिवासी आहे. महिलेचे म्हणणे आहे की, जावेद हबीब यांनी तीन दिवसांपूर्वी हॉटेल किंग व्हिला येथे एका वर्कशॉपमध्ये हे प्रात्यक्षिक दिले होते.बदौतमध्ये वंशिका ब्युटी पार्लरमध्ये काम करणाºया पूजा गुप्ता यांनी म्हटले की, वर्कशॉप दरम्यान जावेद हबीब माझ्या केसांवर दोनदा थुंकले. असे करून त्यांनी माझा अपमान केला आहे.

    माझी नऊ वर्षांची कारकीर्द संपली. मी वर्कशॉपमध्ये पुन्हा केस कापले नाहीत. माझ्या गल्लीतील न्हाव्याकडून माझे केस कापून घेईल. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. हबीब यांच्यावर कठोर कारवाई करावी.वरिष्ठ पोलीस अधीक्षक अभिषेक यादव यांनी याबाबत सांगितले की, व्हिडिओशी संबंधित अधिक माहिती गोळा केली जात आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

    Take action against hairstylist Javed Habib, orders of National Commission for Women

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र