• Download App
    कोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस! । Take a photo of getting Corona vaccine and win a prize of Rs 5000 My Gov Initiative

    कोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस!

    Corona vaccine : देशात सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरणही सुरू आहे. लसीकरण वाढावे यासाठी आता केंद्र सरकारने आकर्षक बक्षीसही देऊ केले आहे. म्हणजेच लस घेऊन कोरोनापासून बचावही आणि दुसरीकडे बक्षीसही, अशी ही दुहेरी फायद्याची ऑफर आहे. Take a photo of getting Corona vaccine and win a prize of Rs 5000 My Gov Initiative


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरणही सुरू आहे. लसीकरण वाढावे यासाठी आता केंद्र सरकारने आकर्षक बक्षीसही देऊ केले आहे. म्हणजेच लस घेऊन कोरोनापासून बचावही आणि दुसरीकडे बक्षीसही, अशी ही दुहेरी फायद्याची ऑफर आहे.

    असं जिंका 5 हजारांचं बक्षीस

    कोरोनाची लस घेताना तुम्हाला फक्त एक फोटो क्लिक करायचा आहे. हो फोटो पोस्ट करून तुम्ही 5 हजारांच्या बक्षीसासाठी पात्र होऊ शकता. MyGov कडून लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत जर एखाद्या व्यक्तीने लस घेतानाचा फोटो शेअर करून त्यासोबत एक चांगली टॅगलाइन दिली, तर अशा व्यक्तीला 5 हजार रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे.

    My Govच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने स्वत:चा किंवा कुटुंबातील सदस्याचा लस घेतानाचा फोटो चांगल्या टॅगलाइनसोबत शेअर करायचा आहे. या टॅगलाइनमध्ये लसीचे कसे महत्त्व आहे, यासंबंधी माहिती देणे आवश्यक आहे. यातून इतरांना प्रोत्साहन मिळायला हवे. प्रत्येक महिन्यात 10 सर्वोत्कृष्ट टॅगलाइनचा वापरणाऱ्यांना 5-5 हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.

    फोटो शेअर करताना नियम पाळणे गरजेचे

    केंद्राच्या या मोहिमेची मुदत 31 डिसेंबरपर्यंत आहे. यानुसार लस घेतानाचाच फोटो ग्राह्य धरला जाणार आहे. यादरम्यान, कोरोनाच्या नियमावलीचे पालन होणेही गरजेचे आहे. उदा. मास्क तोडावर असायला हवा.

    लस घेण्यासाठी काय कराल?

    कोरोनाची लस सध्या 45 वर्षांवरील सर्व व्यक्तींसाठी खुली आहे. लवकरच ती इतर वयोगटांसाठीही खुली होण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. लस घेण्यासाठी प्रामुख्याने कोविन अॅप किंवा वेबसाइटवर नोंदणी केली जात आहे. http://cowin.gov.in च्या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करून अपॉइंटमेंट घेऊ शकता. याशिवाय विविध लसीकरण केंद्रांवर ऑफलाइन सुविधाही देण्यात आली आहे.

    Take a photo of getting Corona vaccine and win a prize of Rs 5000 My Gov Initiative

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य