विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ताजमहाल, कुतुबमीनारपासून खजुराहो व वेरूळ अजिंठ्याच्या लेण्यांपर्यंत ही स्मारके आता पर्यटकांसाठी पुन्हा खुली होतील.
गेल्या दोन महिन्यांपासून जास्त काळ बंद असलेली ऐतिहासिक आणि संरक्षित स्मारके येत्या १६ जून पासून पूर्ववत उघडण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला. देशात ११६ संरक्षित स्मारके म्हणून जाहीर केली आहेत. ताजमहाल आणि वेरूळ अजिंठ्याच्या लेण्यांचा उल्लेख युनेस्कोनेही जागतिक वारसा स्थळांमध्ये केला. या स्मारकामध्ये सर्वाधिक १७ स्मारके उत्तर प्रदेशात आणि त्याखालोखाल १२ स्मारके महाराष्ट्रात आहेत. Taj, kutubminar opens from tomorrow
१६ एप्रिलपासून ही स्मारके बंद ठेवण्यात आली होती. सुरवातीला १५ दिवसांसाठी आणि नंतर ही बंदी वाढवत वाढवत २ महिने इतकी वाढविण्यात आली होती. मात्र आता देशभरात कोरोनाची लाट ओसरत असून दैनंदिन रुग्ण संख्या ७० हजारांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे कोरोना नियम पाळून आणि पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा म्हणून ही स्मारके खुली करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.
Taj, kutubminar opens from tomorrow
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातून दिल्लीला जाणाऱ्या विमान प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट बाळगण्याची गरज नाही
- अजित पवार नाना पटोलेंना म्हणाले, कोणी काही विधान करत असेल तर त्याला महत्व नाही
- रामद्रोहींकडून राजकीय फायद्यासाठी जमीन खरेदी व्यवहारात अनियमिततेचा आरोप, काडीचाही संशय नसल्याने चौकशी होणार नाही, विश्व हिंदू परिषदेने केले स्पष्ट
- रामभक्तांची दिशाभूल करण्यासाठी राजकीय षडयंत्र, जमीन बाजारभावानुसारच खरेदी, चंपत रॉय यांनी केले स्पष्ट
- सहा वर्षांच्या नातवासमोर साठ वर्षीय महिलेवर तृणमूलच्या गुंडांकडून बलात्कार, पश्चिम बंगालमधील मे महिन्यातील भयानक प्रकार आले पुढे