• Download App
    Tahawwur Rana तहव्वुर राणा कुटुंबाशी फोनवर बोलू शकेल!, न्यायालयाने ‘या’ अटीसह दिली परवानगी

    Tahawwur Rana तहव्वुर राणा कुटुंबाशी फोनवर बोलू शकेल!, न्यायालयाने ‘या’ अटीसह दिली परवानगी

    तहव्वुर राणाने डेव्हिड हेडलीला त्याच्या कन्सल्टन्सी फर्ममध्ये नोकरीही दिली होती Tahawwur Rana

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – पटियाला हाऊस कोर्टाने २६/११ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला त्याच्या कुटुंबाशी एकदा फोनवर बोलण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाने सोमवारपासून १० दिवसांच्या आत राणाच्या प्रकृतीबाबत नवीन अहवाल मागितला आहे. Tahawwur Rana

    दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाचे विशेष न्यायाधीश चंदरजीत सिंह यांनी राणाला फक्त एकदाच ही सूट दिली. न्यायाधीशांनी सांगितले की हा कॉल तुरुंग नियमावलीनुसार असेल आणि तिहार तुरुंग प्राधिकरणाच्या देखरेखीखाली असेल. न्यायालयाने तुरुंग अधिकाऱ्यांना एक अहवाल दाखल करण्याचे निर्देशही दिले, ज्यामध्ये राणाला नियमित फोन कॉल करण्याची परवानगी द्यायची की नाही यावर त्यांची भूमिका स्पष्ट करावी. असे म्हटलं. Tahawwur Rana



    असा दावा केला जात आहे की मुंबईती दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाने डेव्हिड हेडलीला त्याच्या कन्सल्टन्सी फर्ममध्ये नोकरीही दिली. डेव्हिड हेडली या फर्मच्या मुंबई शाखेच्या कामासाठी मुंबईत आला होता आणि येथे त्याने लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी हल्ल्यांची तयारी करण्यासाठी मुंबईतील ताजमहाल हॉटेल आणि छत्रपती शिवाजी टर्मिनससारख्या महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली.

    तपासकर्त्यांचा असा विश्वास आहे की तहव्वुर राणाने कन्सल्टन्सी फर्मच्या नावाखाली डेव्हिड हेडलीकडून संपूर्ण रेकीचे काम करून घेतले. २००८ मध्ये पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेच्या लष्कर-ए-तोयबाच्या १० दहशतवाद्यांनी मुंबईत प्रवेश केला आणि संपूर्ण शहरात हल्ला केला. या बर्बर हल्ल्यांमध्ये सहा अमेरिकन नागरिक आणि काही ज्यूंसह १६६ लोक मारले गेले. Tahawwur Rana

    एनआयएने इतर भारतीय गुप्तचर संस्था, एनएसजीसह संपूर्ण प्रत्यार्पण प्रक्रिया पार पाडली. भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारांतर्गत एनआयएने सुरू केलेल्या न्यायालयीन कार्यवाहीच्या आधारे राणाला अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले. राणाच्या अनेक कायदेशीर अपील आणि अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात आणीबाणीच्या याचिकेला फेटाळल्यानंतर प्रत्यार्पण शक्य झाले.

    भारताच्या परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या सततच्या प्रयत्नांमुळे फरार राणासाठी प्रत्यार्पण वॉरंट मिळण्यास मदत झाली. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून दहशतवादात सहभागी असलेल्या व्यक्तींना न्यायाच्या कक्षेत आणण्यासाठी भारतासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल होते.

    Tahawwur Rana will be able to talk to his family on the phone

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mohd Yunus  ढाक्यामध्ये लोकशाही वाद्यांच्या निदर्शनांवर बंदी घालून नोबेल पुरस्कार विजेता राज्यकर्ता harmony award घेण्यासाठी गेला लंडनला!!

    आता RCBने चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयात घेतली धाव

    Sarsanghchalak : सरसंघचालकांची स्वयंसेवकांशी पंच परिवर्तनावर चर्चा, संघाचे साहित्य प्रत्येक घरात पोहोचवण्यावर भर