T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कप 2021 चे आयोजन भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणार आहे. काही सामने ओमानमध्येही होऊ शकतात. ही स्पर्धा 17 ऑक्टोबरला सुरू होणार असून अंतिम सामना 14 नोव्हेंबरला होईल. मंगळवारी आयसीसीने याची अधिकृत माहिती दिली. बीसीसीआय या मोठ्या स्पर्धेचे यजमान म्हणून कायम राहील. 16 संघांची ही स्पर्धा यूएईच्या तीन शहरांमध्ये (दुबई, शारजाह आणि अबू धाबी) आणि ओमान येथे खेळली जाईल. T20 World Cup 2021 To Run From 17th October To 14th November In UAE And Oman
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : टी-20 वर्ल्ड कप 2021 चे आयोजन भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणार आहे. काही सामने ओमानमध्येही होऊ शकतात. ही स्पर्धा 17 ऑक्टोबरला सुरू होणार असून अंतिम सामना 14 नोव्हेंबरला होईल. मंगळवारी आयसीसीने याची अधिकृत माहिती दिली. बीसीसीआय या मोठ्या स्पर्धेचे यजमान म्हणून कायम राहील. 16 संघांची ही स्पर्धा यूएईच्या तीन शहरांमध्ये (दुबई, शारजाह आणि अबू धाबी) आणि ओमान येथे खेळली जाईल.
यापूर्वी सोमवारी बीसीसीआयने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणार्या टी-२० विश्वचषक स्पर्धेला दुजोरा दिला होता. बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले होते की, आम्ही स्पर्धा यूएईमध्ये स्थलांतरित करणार आहोत. गतवर्षी कोरोना महामारीने जागतिक क्रिकेट कॅलेंडरमध्ये बाधा आणल्यामुळे आयसीसीने 2020 विश्वकरंडक पुढे ढकलला, जो मूळचा ऑस्ट्रेलियामध्ये होणार होता. यानंतर हे निश्चित करण्यात आले की, 2021 संस्करण भारतात खेळले जाईल, तर 2020चे संस्करण ऑस्ट्रेलियामध्ये खेळले जाईल.
पहिल्या फेरीत चार संघ पात्र ठरतील
माध्यमांच्या वृत्तानुसार, राऊंड -1 मध्ये 12 सामने होणार असून 8 संघ त्यात सहभागी होतील. यातील चार (प्रत्येक गटातील टॉप दोन) सुपर 12 साठी पात्र ठरतील. आठ संघांपैकी क्वालिफाइड चार संघ (बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान, पापुआ न्यू गिनी) पहिल्या आठ क्रमांकाच्या टी -20 संघात सामील होऊन सुपर 12 मध्ये प्रवेश करतील. पहिल्या फेरीत यूएईच्या जागेव्यतिरिक्त ओमानमध्येही स्पर्धा होईल आणि सुपर 12 सामन्यांसाठी यूएईच्या मुख्य मैदानावरील खेळपट्ट्यांना तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.
सुपर -12 मध्ये 30 सामने
30 सामन्यांचा समावेश असलेला सुपर 12 फेज 24 ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. सुपर 12 मधील संघांना प्रत्येकी सहा गटांच्या दोन गटांत विभागले जाईल. जे यूएईच्या तीन ठिकाणी (दुबई, अबू धाबी आणि शारजाह) खेळल्या जातील. यानंतर तीन प्लेऑफ सामने, दोन उपांत्य फेरी आणि अंतिम सामने असतील.
T20 World Cup 2021 To Run From 17th October To 14th November In UAE And Oman
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेकडून भारताला 4.1 कोटी डॉलरचे अतिरिक्त साहाय्य, कोरोना नियंत्रणासाठी मिळणार मदत
- जम्मू-काश्मीरवर पीएम मोदी यांची हायलेव्हल मीटिंग, संरक्षणमंत्री, गृहमंत्री आणि एनएसए डोभाल उपस्थित
- UPच्या धर्मांतर गँगचे बीड कनेक्शन, मंत्रालयात काम करणाऱ्या परळीच्या इरफानला अटक
- सेंट्रल व्हिस्टावर बंदीची मागणी करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही, दंड भरावा लागणार
- सुप्रीम कोर्टाचा राज्य, केंद्रशासित प्रदेशांना आदेश, 31 जुलैपर्यंत One Nation One Ration Card योजना लागू करा