• Download App
    संयुक्त राष्ट्र्रसंघातील मताचा संबंध पेगासशी जोडणे न्यूयॉर्क टाईम्सची भयंकर चूक, सय्यद अकबरुद्दीन यांची टीका|Syed Akbaruddin criticizes New York Times for linking UN vote to Pegasus

    संयुक्त राष्ट्र्रसंघातील मताचा संबंध पेगासशी जोडणे न्यूयॉर्क टाईम्सची भयंकर चूक, सय्यद अकबरुद्दीन यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :  संयुक्त राष्ट्र्रसंघात  मताच्या बदल्यात पेगासस कराराचा गुप्तहेर साधनाशी संबंध जोडणे ही न्यूयॉर्क टाईम्सची भयंकर चूक असल्याची टीका संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटले आहे.Syed Akbaruddin criticizes New York Times for linking UN vote to Pegasus

    भारत आणि इस्रायलमध्ये २०१७ मध्ये जवळपास दोन अब्ज डॉलर्सचा करार झाला होता. अत्याधुनिक शस्त्रे आणि गुप्तचर उपकरणे २०१९ मध्ये भारताने संयुक्त राष्ट्रात इस्रायलच्या बाजूने दिलेल्या मतदानाशी संबंधित आहे, असे न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे.



    अकबरुद्दीन यांनी म्हटले आहे की,  २०१९ मध्ये नवी दिल्ली, इस्रायल किंवा पॅलेस्टाईनमधील कोणीही न्यूयॉर्कमधील भारतीय मिशनशी संपर्क साधला नाही.  मताच्या बदल्यात पेगासस कराराचा गुप्तहेर साधनाशी संबंध जोडणे ही भयंकर चूक आहे. भारत आणि इस्रायल संबंध सुधारले आहेत यात कोणतीही शंका नाही. हे संयुक्त राष्ट्रांमध्ये सर्वांना दिसून आले आहे.

    इस्रायलने इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमधील एका भारतीय न्यायाधीशाचे समर्थन केले होते, असे मी माझ्या पुस्तकात लिहिले आहे. त्याचा काही संबंध आहे, असे मला वाटत नाही. हे एका पॅलेस्टिनी एनजीओचे एक साधे प्रकरण होते… आणि सुरवातीला कुणालाही यात काही अडचण नव्हती. त्यावेळी अनेक देश पुढे आले

    आणि म्हणाले की, त्यांना काही लिंक सापडल्या ज्या एनजीओने सुरवातीच्या प्रेझेंटेशनमध्ये उघड केल्या नाहीत. म्हणूनच आम्हाला निर्णय घ्यावा लागला. कारण आम्हाला गैर-सरकारी संस्थांच्या (एनजीओ) दहशतवाद्यांच्या घुसखोरीबद्दल अनेक चिंता होत्या. भारताने फेरविचार करण्यासाठी एक मसुदा प्रस्तावित केला होता.

    जेव्हा ही बाब समोर आली तेव्हा, ही समिती सांभाळणारा माझा सहकारी माझ्याकडे आला. आपण काय करायचे?’, असे त्याने विचारले. ठीक आहे, हा एक दहशतवाद्यांशीसंबंधित मुद्दा आहे, असे पापणी लवाच्या आत मी त्यांना सांगितले. या बैठकीला उशीर केल्यास आपल्याला त्यात काही अडचण का येईल?’ असे ते सांगत होते.

    मी कधीही कोणाशीही सल्लामसलत केली नाही आणि आवश्यक सूचना दिल्या. कारण ते आपल्या धोरणाशी सुसंगत होते. यावर किंवा त्यानंतर नवी दिल्लीतून माझ्याशी कोणीही संपर्क साधला नाही किंवा पॅलेस्टिनींनी माझ्याशी संपर्क साधला नाही. कारण ती एक एनजीओ होती. थोडं आश्चर्य वाटलं की न्यूयॉर्क टाइम्सने एका छोट्या एनजीओबद्दल वेगळी भूमिका घेतली आणि एका मोठ्या कथेशी त्याचा संबंध जोडला.

    भारत आणि इस्रायल यांच्यातील अत्याधुनिक शस्त्रे आणि गुप्तचर उपकरणांच्या सुमारे दोन अब्ज डॉलर्सच्या करारामध्ये पेगासस स्पायवेअर आणि क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदीचा प्रामुख्याने समावेश होता. २०१७ मध्ये हा करार झाला होता, असे अमेरिकेतील वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे.

    Syed Akbaruddin criticizes New York Times for linking UN vote to Pegasus

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य