प्रतिनिधी
मुंबई : स्विगी ही घरोघरी जेवणाची ऑर्डर पोहोचवणारी कंपनी कायम वाद निर्माण करत असते, विशेषत: हिंदूंच्या धार्मिक भावनांना डिवचत असते. या आधीही हैद्राबाद येथे एका ग्राहकाकडे त्यांची जेवणाची ऑर्डर घेऊन मुस्लिम मुलाला पाठवल्याने त्याला त्या ग्राहकाने विरोध केल्यावर लिबरल्सनी सोशल मीडियावर मोठा आरडाओरडा केला होता. पण आता स्विगीने होळीच्या दिवशी हि सण साजरा करण्याविषयी अपप्रचार करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर लिबरल्स गप्प आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी #बॉयकट स्विगी ट्रेंड चालवला आहे. Swiggy hurts hindu sentiments on holi
काय म्हटले आहे स्विगीने जाहिरातीत?
स्विगीने होळीच्या निमित्ताने ही जाहिरात दिली आहे, ज्यात स्विगीने म्हटले की, ‘अंडे ऑमलेट बनवण्यासाठी, अंडे हाल्फ बॉईल ऑमलेट बनवण्यासाठी, अंडे कुणाच्या डोक्यात फोडण्यासाठी नाही. ही जाहिरात प्रसिद्ध करून स्विगीने हिंदू समाजाला डिवचले आहे.
काय म्हणतात नेटकरी?
या निमित्ताने नेटकऱ्यांनी स्विगी हिंदूंच्या सणाची बदनामी का करत आहे?, अशी विचारणा केली आहे, काही नेटकऱ्यांनी स्विगीने अन्य धर्मियांनी कोणत्या शब्दांत त्यांच्या सणांना शुभेच्छा दिल्या होत्या, याची आठवण करून दिली. स्विगीने हॅपी ख्रिसमस म्हटले, स्विगीने ईद मुबारक म्हटले मग हिंदूंच्या सणांची बदनामी का करत आहे?, अशी विचारणा केली आहे.
तर काहींनी नैसर्गिक रंगांमध्ये खेळली जात असलेल्या होळीचा फोटो ट्विट करून ‘इथे कुठे अंड्याचा वापर होतोय’, अशी विचारणा केली आहे, तर काहींनी स्विगीचे ऍप काढून टाकण्याचे आवाहन केले आहे.
Swiggy hurts hindu sentiments on holi
महत्वाच्या बातम्या
- …होय भारत सोने की चिडीया! मोदी सरकारच्या काळात देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा लागतोय नव्याने शोध
- संसदेतील माइक बंद केल्याच्या राहुल गांधींच्या वक्तव्यावर उपसभापती संतापले, म्हणाले- ते खोटे बोलत आहेत
- सिसोदिया यांना केरळच्या मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा : पीएम मोदींना लिहिले पत्र, म्हणाले- एजन्सी त्रास देत आहेत, अटक चुकीची