• Download App
    स्वीडिश व्यंगचित्रकाराच्या संशयास्पद मृत्यूचा तपास सुरू, पैगंबर मोहम्मद यांचे काढले होते वादग्रस्त व्यंगचित्र|sweden police investigating prophet muhammad cartoonist lars vilks death case

    स्वीडिश व्यंगचित्रकाराच्या संशयास्पद मृत्यूचा तपास सुरू, पैगंबर मोहम्मद यांचे काढले होते वादग्रस्त व्यंगचित्र

     

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पैगंबर मोहम्मद यांचे वादग्रस्त व्यंगचित्र बनवून प्रकाशझोतात आलेल्या स्वीडिश व्यंगचित्रकार लार्स विल्क्स यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे. त्याच्या संरक्षणासाठी असलेल्या दोन पोलिसांचाही त्यांच्यासोबत मृत्यू झाला.sweden police investigating prophet muhammad cartoonist lars vilks death case

    स्वीडिश पोलीस या प्रकरणाला संशयास्पद मानत आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, या अपघातानंतर विल्क्सची कार आणि त्यांना धडकणाऱ्या ट्रकला दोन्हींनाही आग लागली होती. या अपघातात ट्रकचालकही गंभीर जखमी झाला आहे.



    हा रस्ता अपघात रविवारी दक्षिण स्वीडनमधील मार्क्रिड या छोट्या शहरात झाला. पोलीस या प्रकरणाकडे संशयानेही पाहत आहेत, कारण लार्स विल्क्स यांच्यावर यापूर्वी दोनदा हल्ले झाले होते. त्यात ते थोडक्यात बचावले होते. या हल्ल्यांनंतरच विल्क्स यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते.

    दक्षिण स्वीडनचे पोलीस प्रमुख स्टीफन सिन्टीयस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “आम्ही या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहोत, कारण यापूर्वी लार्स विल्क्सवर प्राणघातक हल्ले झाले होते. तथापि, या अपघातातील चकित करणारी बाब म्हणजे ज्या ड्रायव्हरने धडक दिली तो स्वतःच आगीमध्ये गंभीर भाजला आहे.

    पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, 75 वर्षीय लार्स विल्क्स पोलीस वाहनात कुठेतरी जात असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे वाहन उलटले आणि एका ट्रकला धडकले. त्यानंतर दोन्ही वाहनांना आग लागली. या अपघातात 45 वर्षीय ट्रक चालकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    sweden police investigating prophet muhammad cartoonist lars vilks death case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार