राहुल गांधींना भेटण्यासाठी वेळही मागितली
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी 13 मे रोजी घडलेल्या घटनेनंतर दिल्लीच्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल आणि राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. स्वाती मालीवाल यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली आहे.Swati Maliwal’s letter to the leaders of the I.N.D.I.A.
स्वाती मालीवाल यांनी X वर पोस्ट शेअर केली आणि सांगितले की त्यांनी इंडिया आघाडीच्या मोठ्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. त्या म्हणाल्या की, मी गेली 18 वर्षे जमिनीवर काम केले आहे आणि नऊ वर्षांत महिला आयोगात 1.7 लाख प्रकरणे ऐकली आहेत.
त्यांनी पुढे लिहिले की, कोणाला न घाबरता आणि कोणाच्याही समोर न झुकता. महिला आयोगाला खूप मोठ्या पातळीवर नेले. पण मुख्यमंत्र्यांच्या घरी आधी मला बेदम मारहाण झाली, त्यानंतर माझ्या चारित्र हरण झाले, हे अतिशय दुःखद आहे. आज मी इंडिया आघाडीच्या सर्व बड्या नेत्यांना या विषयावर पत्र लिहिले आहे. मी सर्वांशी भेटीची वेळ मागितली आहे.
Swati Maliwal’s letter to the leaders of the I.N.D.I.A.
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या अनपेक्षित अपयशाच्या दुष्परिणाम; संसदेभोवती घट्ट आवळला घराणेशाहीचा फास!!
- भारतीय नौदलाच्या ताफ्यात आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सहा पाणबुड्यांचा समावेश
- राहुल गांधी रायबरेली ठेवणार, वायनाड सोडणार; प्रियांका गांधी तिथून लढणार!!
- अर्थसंकल्प 2024: अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्पापूर्वी उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार