• Download App
    स्वाती मालीवाल, खुशबू सुंदर यांनी सांगितली घरातीलच लैंगिक अत्याचाराची कहाणी.. आणि लढण्याचेही दिले बळ !! Swati Maliwal, Khusbu Sundar toldh the story of sexual abuse at home.. and gave them the strength to fight!! 

    स्वाती मालीवाल, खुशबू सुंदर यांनी सांगितली घरातीलच लैंगिक अत्याचाराची कहाणी.. आणि लढण्याचेही दिले बळ !!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : वाईट नजर, बॅड टच हे प्रत्येक मुलगी आपल्या आयुष्यात अनुभवतेच. काही मुलीनंसोबत लहानपणी लैंगिक अत्याचार देखील झालेले असतात. पण खूप कमी मुली समोर येऊन ते उघडपणे बोलण्याचे धाडस करतात. Swati Maliwal, Khushbu Sundar told the story of sexual abuse at home.. and gave them the strength to fight!!

    दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी शनिवारी सांगितले. की त्या लहान असताना त्यांच्या वडिलांकडून त्या लैंगिक अत्याचाराला बळी पडल्या होत्या. महिला आयोगाने आयोजित केलेल्या. एका पुरस्कार सोहळ्यात सहभागी होताना. स्वाती मालीवाल म्हणाल्या की, या कार्यक्रमाने त्यांना भाऊक केले. कारण महिला पुरस्कार विजेत्यांच्या संघर्षकथांनी त्यांना स्वतःची संघर्ष कहाणी आठवली. त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार कसे केले हे सांगताना त्या म्हणाल्या माझे वडील मला खूप मारायचे. ते घरी आल्यावर मी पलंगाखाली लपून बसायचे. माझे केस धरून माझे डोके भिंतीवर जोरात आपटायचे. मी चौथीपर्यंत माझ्या वडिलांसोबत राहिले. हे सगळं अनुभवताना मला या अत्याचारांविरुद्ध महिलांचे सक्षमीकरण कसे करता येईल. हा विचार सतत डोक्यात यायचा. व याच विरोधात लढताना मी हि वाटचाल निवडली. आज महिला आयोगासाठी काम करताना. महिला सक्षमीकरणाकडे माझे शंभर टक्के लक्ष असते.

    त्याचसोबत, अलीकडेच अभिनेत्री, राजकारणी बनलेल्या भाजपाच्या खुशबू सुंदर राष्ट्रीय महिला आयोगाची सदस्य बनले आहेत. त्यांनी वयाच्या 8 वर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर केलेल्या लैंगिक अत्याचाराचा अनुभव सांगितला. मला वाटतं जेव्हा एखाद्या मुलीवर अत्याचार होतो. तेव्हा त्याच्या इफेक्ट त्या मुलीच्या मनावर आयुष्यभर राहतो. आणि हे मुली किंवा मुलाबद्दल नाही. तर माझ्या आईने लग्नानंतर खूप अत्याचार सहन केले. मारहाण सहन केली. माझे वडील माझ्या आईला मारहाण करायचे. मुलांना मारहाण करायचे. एकुलती एका मुलीवर लैंगिक अत्याचार करणे, हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. असे मानणारा तो माणूस होता. जेव्हा माझ्यावर अत्याचार सुरू झाले. तेव्हा मी फक्त 8 वर्षाची होते आणि मी 15 वर्षाची असताना. त्यांच्याविरुद्ध बोलण्याचे धाडस केले होते.

    हे दोन्हीही अनुभव वाचल्यावर लक्षात आले. की सगळ्याच मुलींना या अशा कुठल्या ना कुठल्या स्वरूपाच्या अत्याचारांना सामोरे जावेच लागले आहे. पण या दोन महिलांवर झालेल्या अत्याचारानंतर त्यांचे अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी उभे राहणे. पाहून सामान्य स्त्रीला देखील आपल्यावर होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध लढण्यासाठी बळ येईल. असे वाटते. आपल्याच मुलीला आपले फळ समजून ते आपणच चाखून पहिले तर काय हरकत? अशा विकृत वृत्तीच्या माणसांची डोके ठिकाणावर आणण्यासाठी महिलांनाच सक्षमपणे उभे राहणे गरजेचे आहे. आणि तळागाळातून येऊन एवढा मोठा पल्ला गाठलेल्या या दोन महिला नेत्यांच्या या खऱ्या कथा, सामान्य बाईसाठी नक्कीच इन्स्पायरिंग ठरू शकतात.

    Swati Maliwal, Khushbu Sundar told the story of sexual abuse at home.. and gave them the strength to fight!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!