विभव कुमार 28 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहेत. Swati Maliwal case Court grants Vibhav Kumar four days judicial custody
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्वाती मालीवाल प्रकरणी न्यायालयाने विभव कुमारला चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तीस हजारी न्यायालयाच्या आदेशानुसार, विभव कुमार 28 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहेत.
विभवला आज (ता. 24) न्यायालयात हजर केले असता, पोलिसांनी चार दिवसांची न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती, ती न्यायालयाने मान्य केली. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, न्यायालयाच्या सूचनेनुसार आम्ही कुटुंबातील सदस्य आणि वकिलाला विभवला भेटण्याची परवानगी दिली होती.
न्यायालयीन कोठडी किंवा पोलिस कोठडी या दोन्ही गोष्टींचा आरोपीच्या स्वातंत्र्यावर परिणाम होतो, असे विभवच्या वकिलाने सांगितले. कोणत्याही गोष्टीची मागणी वाजवी असावी. विभवच्या वकिलाने सांगितले की, न्यायालयीन कोठडी १४ दिवसांची आहे, मात्र पोलिस ४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मागत आहेत.