विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासस्थानात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पीए बिभव कुमार याने मारहाण केली. त्याविषयी स्वतः स्वाती मालीवाल यांनी फोन करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्या सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करायला गेल्या. परंतु अद्याप कुठलीच तक्रार दाखल झालेली नाही. त्याचबरोबर बिभव कुमार याच्यावर आम आदमी पार्टीने कुठली कारवाई केल्याची ही बातमी समोर आलेली नाही.Swati Maliwal beating mystery grows; No case filed, no action; Maliwal – Kejriwal still has no revelations!!
स्वाती मालीवाल यांना मारहाण होऊन आता 72 तास उठून गेले. त्यानंतर स्वाती मालीवाल अजूनही मीडियासमोर किंवा अन्यत्र सार्वजनिक कार्यक्रमात आलेल्या नाहीत. त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा त्यांचे आधीचे पती नवीन जयहिंद यांनी केला. स्वाती मालीवाल नेमक्या कुठे आहेत?? त्या मीडियासमोर किंवा सार्वजनिक कार्यक्रमात अद्याप हजर का राहिल्या नाहीत??, असे एकापाठोपाठ एक सवाल भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी उपस्थित केले.
वास्तविक काँग्रेस आता दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचा मित्र पक्ष आहे. परंतु स्वाती मालीवाल प्रकरणाचे गूढ एवढे वाढले आहे की, काँग्रेसला समोर येऊन आम आदमी पार्टीच्या विषयी ठळक प्रश्नचिन्ह लावण्याचे दुसरा पर्याय उरला नाही.
स्वाती मालीवाल यांच्याशी बिभव कुमार याने “गैरवर्तन” केले. त्याची दखल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतः घेतली आणि बिभव कुमार याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले, अशी माहिती आणि कबुली दारू घोटाळ्यात तुरुंगात जाऊन आलेले आणि सध्या जामिनावर असलेले खासदार संजय सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. परंतु बिभव कुमार वर अद्याप कुठली कारवाई झाली. याविषयी मात्र आम आदमी पार्टीच्या कुठल्याही नेत्याने अद्याप खुलासा केलेला नाही. स्वतः अरविंद केजरीवाल यांनी देखील पुढे येऊन स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात कुठलाही खुलासा केलेला नाही.
स्वाती मालीवाल यांच्या यांना केजरीवाल यांच्या मुख्यमंत्री पदाच्या अधिकृत निवासस्थानात मारहाण झाली. परंतु ते केवळ “गैरवर्तन” असल्याची लीपापोती खासदार संजय सिंग यांनी केली. त्यानंतर स्वाती मालीवालांच्या जीवाला धोका असल्याचा दावा त्यांच्या आधीच्या पतीने केला, पण स्वतः स्वाती मालीवाल किंवा अरविंद केजरीवाल अजूनही मारहाण प्रकरणाचा खुलासा करायला समोर आलेले नाहीत. किंवा बिभव कुमार याच्यावर नेमकी काय कारवाई केली??, पोलिसांमध्ये अजून गुन्हा का दाखल झाला नाही??, याविषयीचा कुठलाही खुलासा झालेला नाही. त्यामुळे एकूणच मारहाण प्रकरणाचे गूढ प्रचंड वाढले आहे.
दिल्लीच्या दारू घोटाळ्यात फक्त मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तसेच खासदार संजय सिंग यांनाच अटक झाली असे नाही, तर आता ईडी संपूर्ण आम आदमी पार्टीवरच विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहे. दारू घोटाळ्यातला सगळा पैसा आम आदमी पार्टीने गोवा निवडणुकीत खर्च केल्याचा आरोप आहे.
सर्वांत महत्त्वाचा सवाल
मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अटक झाली त्यावेळी स्वाती मालीवाल भारतातच नव्हत्या. त्या परदेशात होत्या. त्याचबरोबर आम आदमी पार्टीचे दुसरे खासदार राघव चढ्ढा आणि त्याची बॉलीवूड अभिनेती अभिनेत्री पत्नी प्रणिती चोपडा हे दोघे युरोपमध्ये होते. दरम्यान अरविंद केजरीवालांना अटक झाली. ते दीड महिना तुरुंगात राहिले आणि निवडणुकीच्या प्रचारापुरते सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बाहेर आले. त्यानंतर अरविंद केजरीवाल्यांना भेटण्यासाठी स्वाती मालीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासात गेल्या आणि त्यांना मारहाण झाली. या सगळ्या घटनाक्रम पाहिला तर ती मालीवाल प्रकरणातले गूढ किती खोलवर रुजले आहे??, हा सवाल तयार झाला आहे.
Swati Maliwal beating mystery grows; No case filed, no action; Maliwal – Kejriwal still has no revelations!!
महत्वाच्या बातम्या
- ‘आम्हालाही मोदींसारख्या नेत्याची गरज आहे कारण…’, पाकिस्तानी-अमेरिकन उद्योगपतीने केले कौतुक!
- देशात मोदी “लहर” नाही, मोदी “जहर”; काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांची घसरली जीभ!!
- पुणे जिल्ह्याच्या नारायणगावमधून महादेव बेटिंग ॲपची “करामत”, एकाच बिल्डिंग मधून 70 – 80 जण पोलिसांच्या ताब्यात!!
- केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधियांना मातृशोक; माधवी राजे यांचे निधन