• Download App
    शाहीन बागेतली प्रेम कहाणी : स्वरा भास्करचे समाजवादी नेता फहाद जिरार अहमदशी गुपचूप कोर्ट मॅरेज!! swara bhaskar sp leader fahad ahmad secret wedding

    शाहीन बागेतली प्रेम कहाणी : स्वरा भास्करचे समाजवादी नेता फहाद जिरार अहमदशी गुपचूप कोर्ट मॅरेज!!

    वृत्तसंस्था

    मुंबई : शाहीन बागेतील आंदोलनादरम्यान सुरू झालेली प्रेम कहाणी कोर्ट मॅरेज पर्यंत पोहोचली. बॉलिवूडची लिबरल अभिनेत्री स्वरा भास्कर हिने समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद जिरार अहमद याच्याशी निकाह गाठ बांधली. स्वरा भास्कर हिने 6 जानेवारी 2023 रोजी फहाद अहमद याच्याशी कोर्ट मॅरेज केले. swara bhaskar sp leader fahad ahmad secret wedding

    त्यानंतर तब्बल 40 दिवसांनी तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून आपल्या विवाहाचा खुलासा केला आहे. तिने आपल्या ट्विटर हँडल वरून एक व्हिडिओ शेअर करून आपली शाहीन बागेतून फुललेली प्रेम कहाणी सादर केली आहे. या व्हिडिओत स्वरा भास्कर आणि फहाद हे दोघेही सीएए आणि एनआरसी विरोधात जोरदार भाषण आणि घोषणाबाजी करताना दिसतात. त्याच बरोबर काही ठिकाणी ते एकत्र दिसतात. फहाद अहमदने स्वराला त्याच्या बहिणीच्या निकालासाठी निमंत्रण दिले होते. पण “मजबूर हूं”, असे म्हणून आपण त्या निकाहाला उपस्थित राहू शकणार नाही असे तिने म्हटल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

    त्याचवेळी दोघांचे वेगवेगळे फोटोही व्हिडिओ दिसत असून आपले प्रेम फुलत गेल्याची माहिती स्वराने यातून दिली आहे. 6 जानेवारी 2023 रोजी स्वरा आणि फहाद जिरार अहमद यांनी कोर्ट मॅरेज केले. या विवाहसंबंधीचा खुलासा स्वराने आज 16 फेब्रुवारी 2023 रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर केला आहे.

    फहाद जिरार अहमद हा वयाने स्वरापेक्षा 4 वर्षांनी वयाने लहान आहे. उत्तर प्रदेशात तो समाजवादी पार्टीचे काम करतो. समाजवादी पार्टीच्या एका युवक शाखेचा तो अध्यक्ष आहे.

    सुरुवातीला शाहीन बाग आंदोलनादरम्यान आणि त्यानंतरच्या कृषी आंदोलनादरम्यान या दोघांची जवळीक जास्त वाढली. त्यातून ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि अखेरीस स्वरा भास्कर हिने फहाद जिरार अहमद याच्याशी निकाह गाठ बांधली.

    swara bhaskar sp leader fahad ahmad secret wedding

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज