• Download App
    रस्त्यांची झाडलोट करणाऱ्या महिलेला सरकारी अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसण्याचा मान। Swapper became officer in Rajstan

    रस्त्यांची झाडलोट करणाऱ्या महिलेला सरकारी अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसण्याचा मान

    विशेष प्रतिनिधी

    जोधपूर : महानगरपालिकेची सफाई कर्मचारी म्हणून रस्त्यांची झाडलोट करणाऱ्या महिलेला राजस्थानमधील सरकारी अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसण्याचा मान मिळाला आहे. आशा कंडारा (वय ४०) हिने ही अशक्यप्राय गोष्ट साध्य केली आहे. Swapper became officer in Rajstan

    आशाला दोन मुले असून ती पतीपासून वेगळी राहते. संसार मोडल्यानंतर मुलांचा एकटीने सांभाळ करताना अनेक अडचणी आल्या. जातीभेदापासून लिंगभेदापर्यंत सर्व सहन केले, पण त्याचे दुःख न करता मी हिमतीने लढायचे ठरविले, असे तिने सांगितले.



    विभक्त झाल्यानंतर आशा वडिलांबरोब राहू लागली. तेही जोधपूर महानगरपालिकेत काम करत होते. आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन मुलांना मोठे करण्याचे स्वप्न बाळगताना आशाने आधी शिक्षण पूर्ण करण्याचे ठरविले. ती २०१६ मध्ये पदवीधर झाली.

    महापालिकेची सफाई कामगाराची परीक्षा ती २०१८ उत्तीर्ण झाली आणि ती शहरातील रस्ते झाडण्याचे काम करू लागली. हे काम करतानाच तिने ‘आरएएस’च्या परीक्षेची तयारी सुरू केली होती. ऑगस्ट २०१८मध्ये प्राथमिक परीक्षेत यशस्वी झाल्याने अंतिम परीक्षेच्या तयारीसाठी तिला बळ मिळाले. आता ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याने आशावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जोधपूरच्या महापौरांनी तिचा सत्कार केला.

    Swapper became officer in Rajstan

    हत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!