विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale) कॅप्टन कूल धोनीचा फॅन; शांततेत करून दाखवले काम!! महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावले. भारताचे हे पॅरिस ऑलिंपिक मधले तिसरे पदक ठरले. या स्पर्धेत स्वप्नीलने एकुण 451.4 गुण मिळवले. चीनचा लिऊ युकुनने सुवर्णपदक जिंकले. त्याचे गुण 463.6 होते, तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने रौप्य पदक पटकावलं. Swapnil Kusale olympic 2024 win bronze medal
मी धोनीचा फॅन
स्वप्नीलच्या या कामगिरीनंतर देशासह संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष साजरा झाला. कांस्य पदक पटकवल्यानंतर स्वप्नील म्हणाला की, मी ध्येयावर लक्ष्य ठेवून काम करत होतो, एवढ्या वर्षात जे फॉलो करत होतो, तेच इथे केलं. माझे काही की पॉईंट्स होते, त्यावरच काम केलं. मी क्रिकेटपटू एमएस धोनीचा खूप मोठा चाहता आहे. जसा तो फिल्डवर शांत राहतो, तेच मी धोनीकडून शिकलो, फिल्डवर शांत राहून काम करतो. रुटीन होतं तेच फॉलो केलं. हे पहिलं ऑलिम्पिक होतं, कांस्य जिंकलं, आता पुढच्या ऑलिम्पिकमध्ये यापेक्षा चांगली कामगिरी करेन, अशा शब्दांत स्वप्नील कुसाळेने भावना व्यक्त केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियात पोस्ट लिहून स्वप्नीलचे कौतुक केले. स्वप्नीलने संयम आणि चिकाटी दाखवून भारी कामगिरी केली. 50 मीटर रायफल शूटिंगमध्ये भारताला पदक मिळवून देणारा तो पहिला भारतीय ठरला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे कौतुक केले.
स्वप्नील कुसाळे हे 2015 पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहेत. ज्याप्रमाणे एमएस धोनी त्याच्या आयुष्यात तिकीट कलेक्टर होता, त्याचप्रमाणे स्वप्नील देखील मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो. भारताचा हा नेमबाज महेंद्रसिंग धोनीच्या व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित आहे. स्वप्नील म्हणतो की, त्याने एमएस धोनीचा बायोपिक अनेकदा पाहिला. धोनीच्या कामगिरीतून मी प्रेरणा घेतली. धोनी क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो, तर शूटिंगसाठी देखील शांत आणि संयमशील स्वभावाची आवश्यकता असते. मी तेच फॉलो केले.
पहिल्या पोझिशनमधील गुणसंख्या-
पहिली फेरी- 9.6, 10.4, 10.3, 10.5, 10.0, एकूण: 50.8 गुण
दुसरी फेरी- 10.1, 9.9, 10.3, 10.5, 10.1, एकूण: 51.9 गुण
तिसरी फेरी- 9.7, 10.3, 10.8, 10.4, 10.0, एकूण: 51.6 गुण
दुसऱ्या पोझिशनमधील गुणसंख्या-
पहिली फेरी- 10.5, 10.6, 10.5, 10.6, 10.5, एकूण: 52.7 गुण
दुसरी फेरी- 10.8, 10.2, 10.5, 10.4, 10.3, एकूण: 52.2 गुण
तिसरी फेरी- 10.5, 10.4, 10.4, 10.2, 10.4, एकूण: 51.9 गुण
तिसऱ्या पोझिशनमधील गुणसंख्या-
पहिली फेरी- 9.5, 10.7, 10.3, 10.6, 10.0, एकूण: 51.1
दुसरी फेरी- 10.6, 10.3, 9.1, 10.1, 10.3, एकूण: 50.4 गुण
बाकीचे चार शॉट्स: 10.5, 9.4, 9.9, 10.0
Swapnil Kusale olympic 2024 win bronze medal
महत्वाच्या बातम्या
- Preeti Sudan : प्रीती सूदन UPSCच्या नव्या अध्यक्ष; मनोज सोनी यांच्या राजीनाम्यानंतर नियुक्ती, संरक्षण मंत्रालयासह अनेक खात्यांचा 37 वर्षांचा
- Ajit Pawar vs Sharad pawar : अजितदादांचे मंत्री, आमदारांविरोधात पवारांचा “मोठा प्लॅन”; पण तरुणांना उमेदवारी देण्याशिवाय दुसरा पर्याय काय??
- Ramdas Athawale : रामदास आठवलेंनी दिली अधीर रंजन चौधरींना खुली ऑफर, म्हणाले…
- Ismail Haniyeh : हमास प्रमुख इस्माईल हनियाच्या हत्येबाबत इराणच्या राष्ट्राध्यक्षांचे पहिली प्रतिक्रिया आली समोर!