वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दक्षिणी स्टालिनपुत्राचा उत्तरी अवतार पुन्हा एकदा “उगवला” आहे. अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टीचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदू धर्माला गालिप्रदान केले आहे. Swami Prasad Maurya’s abuse of Hinduism
स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले :
हिंदू हा धोखा म्हणजे फसवणूक आहे. तसेही 1995 मध्ये सुप्रीम कोर्टानेच सांगितले होते की हिंदू नावाचा कोणता धर्म नाही. ती एक जीवनशैली आहे. RSS प्रमुख मोहन भागवत पण एकदा नाही तर दोनदा म्हणालेच होते की हिंदू नावाचा कोणता धर्म नाही. ती जीवनशैलीच आहे. जीवन जगण्याची कला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हेच सांगितले होते की हिंदू हा धर्म नाही. हे सगळे लोक जेव्हा अशी वक्तव्ये करतात, तेव्हा कोणाला काही शंका येत नाहीत. कुणाच्या भावना दुखवत नाहीत. पण स्वामी प्रसाद मौर्य हेच सांगयला लागला की, देशात लगेच मोठा राजकीय भूकंप होतो.
हे तेच स्वामी प्रसाद मौर्य आहेत की, ज्यांनी रामचरित मानस आणि गीता या ग्रंथांचा अपमान केला होता. हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचे पुत्र उदयनिधी स्टालिन यांचाच उत्तरी अवतार आहेत. उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माचा अपमान केला होता. सनातन धर्म हा डेंगी, मलेरिया, एड्स आहे. या रोगांचे जसे आपण निर्मूलन करतो, तसे आपण सनातन धर्माचे निर्मूलन केले पाहिजे, अशी मुक्ताफळे उदयनिधी स्टालिन यांनी उधळली होती.
स्वामी प्रसाद मौर्यांनी देखील हिंदू धर्माला धोखा म्हणताना मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खोटा हवाला दिला. मोहन भागवत आणि मोदी हे हिंदू धर्म नव्हे, ती एक जीवनशैली आहे, हे जरूर म्हणाले होते, पण हिंदू हा धोखा आहे, असे कधीच म्हणाले नव्हते. स्वामी प्रसाद मौर्यांनी हिंदू धर्म हा धोखा आहे, असे म्हणून हिंदू धर्म आणि हिंदू समाजाचा अपमान केला आहे.
Swami Prasad Maurya’s abuse of Hinduism
महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरेंना सत्ता गेल्याने काय बोलावं हेच कळत नाही; राम मंदिराच्या टीकेवरून नारायण राणेंनी घेतला समाचार
- आता लोकसभा निवडणुका झाल्या तर सरकार कोणाचे येणार? सर्वेक्षणात इंडिया-एनडीएला किती जागा? पाहा आकडेवारी
- पक्ष वाढवायचा की मोदी घालवायचा??, हे ठरवा, नाहीतर तेच बोकांडी बसतील; प्रकाश आंबेडकरांचा मविआच्या नेत्यांना इशारा!!
- पंडित धीरेंद्र शास्त्री लवकरच लग्न करणार; लग्नासाठी येत आहेत भावनिक पत्रे, राम मंदिरावरही केले वक्तव्य