• Download App
    शुभेंदू अधिकारींचा गंभीर आरोप, म्हणाले- 'ममता सरकारकडून बलात्काराचा राजकीय शस्त्रासारखा वापर' । Suvendu Adhikari made a big statement, said Mamata government is using rape as a political weapon

    शुभेंदू अधिकारींचा गंभीर आरोप, म्हणाले- ‘ममता सरकारकडून बलात्काराचा राजकीय शस्त्रासारखा वापर’

    Suvendu Adhikari : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारावरून ममता सरकारवर चहुबाजूंनी टीकेची झोड उठलेली आहे. आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर बलात्काराचा राजकीय शस्त्र म्हणून वापर केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच त्याविरोधात अखंड संघर्ष सुरू ठेवण्याची त्यांची घोषणा केली आहे. Suvendu Adhikari made a big statement, said Mamata government is using rape as a political weapon


    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारावरून ममता सरकारवर चहुबाजूंनी टीकेची झोड उठलेली आहे. आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर बलात्काराचा राजकीय शस्त्र म्हणून वापर केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच त्याविरोधात अखंड संघर्ष सुरू ठेवण्याची त्यांची घोषणा केली आहे.

    काल एका भाजप कार्यकर्त्याच्या मूक पत्नीसोबत सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर आले. पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन जणांना अटक केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर टीएमसीने पीडितेच्या पाठीशी असल्याचे सांगितले आणि दोषींना शिक्षा देण्याची मागणी केली. ही घटना आमटा विधानसभा मतदारसंघातील बागनानची आहे.

    न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील

    शुभेंदू अधिकारी यांनी सोमवारी ट्विट केले, “शोकांतिका पाहा, महिला मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात बलात्काराचा राजकीय शस्त्र म्हणून वापर होत आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीची भेट घेतली. त्यांच्यावर टीएमसी कार्यकर्ते कुतुबुद्दीन मलिक आणि देबाशिष राणा यांनी बागानमध्ये सामूहिक बलात्कार केला. आमचे पहिले प्राधान्य त्यांना चांगले उपचार आणि काळजीसाठी खासगी सुविधेत हलवणे होते. या अमानुष गुन्ह्यातील गुन्हेगारांना लपवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आमचे दुसरे प्राधान्य न्याय सुनिश्चित करणे आहे. हे साध्य होईपर्यंत मी थांबणार नाही.”

    काय होती घटना?

    पोलीस तक्रारीनुसार, पीडित महिला शनिवारी रात्री घरी एकटी होती आणि पती काही कामानिमित्त कोलकात्याला गेला होता. टीएमसी ब्लॉक अध्यक्ष कुतुबुद्दीन मलिक आणि टीएमसी युवा अध्यक्ष देबाशीष राणा इतर 12 जणांसह 12.30 वाजता भाजप कार्यकर्त्याच्या घरी पोहोचले. जेव्हा त्यांनी पीडितेचे नाव बाहेरून पुकारले तेव्हा महिलेला असे वाटले पती परत आला आहे. महिले दार उघडल्यावर पाच जण घरात आले आणि त्यांनी महिलेला बांधून बलात्कार केला. घटनेनंतर पीडिता बेशुद्ध झाली होती. दुसऱ्या दिवशी पती घरी परतल्यावर त्याला घटनेची माहिती मिळाली. नंतर महिलेला उपचारासाठी उलुबेरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितेच्या पतीने सांगितले की, माझ्या पत्नीला काही महिन्यांपूर्वी स्ट्रोक आला होता, ज्यामुळे तिला बोलता येत नाही. त्याच्या पत्नीने त्याला सांगितले की, तिच्यावर बलात्कार करणारे पाच जण होते. बलात्काराच्या घटनेनंतर पोलिसांनी दोघांना अटक केली, तर तीन जण अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

    Suvendu Adhikari made a big statement, said Mamata government is using rape as a political weapon

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल