विशेष प्रतिनिधी
कोलकता – पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी यांना कोलकता उच्च न्यायालयाने दिलासा दिला. Suvendu Adhikari get relief from Court
न्यायालयाच्या परवानगीशिवाय सुवेंदू अधिकारी यांना अटक करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. सुवेंदू अधिकारी यांच्या अंगरक्षकाचा २०१८ मध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणी सुवेंदू अधिकारी यांना `सीआयडी`ने समन्स बजावले होते. या समन्सनुसार चौकशीसाठी ते हजर राहिले नाहीत.
सुवेंदू अधिकारी विधानसभा निवडणुकीच्या आधी २०२० मध्ये तृणमूल काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात दाखल झाले होते. त्यांनी नंदिग्राममधून तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांना कोळसा गैरव्यवहारासंबंधी सक्तवसुली संचालनालयाने चौकशीसाठी बोलाविले होते. त्याच दिवशी अधिकारी यांनी सीआयडीने चौकशीसाठी बोलावले.
अधिकारी यांच्या अंगरक्षकाच्या मृत्यूचे कारण सीआयडी शोधत आहे. त्याने आत्महत्या केली का इतर काही कारण होते, याचा तपास पोलिस घेत आहेत. सुवेंदू अधिकारी यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती व अटकेपासून संरक्षणाची मागणी केली होती.
न्यायालयाच्या परवानगीशिवाय या किंवा इतर कोणत्याही प्रकरणात सुवेंदू अधिकारी यांना अटक करण्यात येऊ नये, असे न्यायालयाने आजच्या आदेशात म्हटले आहे.
Suvendu Adhikari get relief from Court
महत्त्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांना ‘डॉ. हेडगेवार प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर ; पुण्यात गुरुवारी वितरण
- लाचखोरी प्रकरणात अनिल देशमुख यांचा वकील आणि सीबीआय सब इन्स्पेक्टरला दोन दिवस न्यायालयीन कोठडी
- Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयाने सिंघू बॉर्डर रिकामी करण्याची याचिका नाकारली, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश