• Download App
    दोन महिन्यांत बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराने फाळणीच्या वेळीच्या हत्याकांडाची आठवण, सुवेन्दू अधिकारी यांचा आरोप|Suvendu Adhikari alleges recollection of partition killings in two months of violence in Bengal

    दोन महिन्यांत बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराने फाळणीच्या वेळीच्या हत्याकांडाची आठवण, सुवेन्दू अधिकारी यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    कोलकत्ता : गेल्या दोन महिन्यांत बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराने फाळणीच्या वेळीच्या हत्याकांडाच्या आठवणी जागृत केल्या आहेत. कोलकत्ता हत्याकांड, नौखाली दंगली आणि शिख हत्याकांडापेक्षाही भयानक हिंसाचार झाला असल्याचा आरोप पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेन्दु अधिकारी यांनी केला आहे.Suvendu Adhikari alleges recollection of partition killings in two months of violence in Bengal

    ममता बॅनर्जी यांनी तिसºयांदा कार्यभार स्वीकारल्यापासून म्हणजे दोन मे पासून तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांनी ३० भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या आहेत. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे बुधवारी शहीद दिन साजरा करण्यात आला.



    यावेळी अधिकारी म्हणाले, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचा अहवाल जगाला हादरवून टाकणारा आहे. त्यामुळे या अहवालावर विचार करून न्यायपालिकेने कारवाई करावी. आत्तापर्यंत उघड झालेली माहिती ही केवळ हिमनगाच्या टोकाइतकी आहे.

    मात्र, हा अहवाल कोणाही सुसंस्कृत माणसाला लज्जास्पद वाटावा असाच आहे. गेल्या दोन महिन्यांत बंगालमध्ये घडलेल्या घटना १९४६ सालच्या कोलकत्ता येथील हत्या, नोखाली दंगली आणि शीख हत्याकांडांपेक्षाही भयानक आहेत. त्यामुळेच ग्रहण लागले आहे.

    गेल्या काही वर्षात राज्यात भाजपाच्या किमान १७५ कार्यकर्त्यांचा तृणमूलच्या गुंडांकडून झालेल्या हल्यात मृत्यू झाला आहे असे सांगून अधिकारी म्हणाले, पोलीसांकडून हल्ले करून राज्यातील भाजपाला संपविता येईल असे ममता बॅनर्जी यांना वाटत आहे. मात्र, त्यांचा हा गैरसमज आहे. भाजपा आणखी जोमाने या अन्यायाचा प्रतिकार करण्यास सज्ज आहे.

    अधिकारी म्हणाले, ममता बॅनर्जी यांच्या गुंडांनी अनुसूचित जातीच्या पुरुष आणि स्त्रियांवर हल्ले केले आहेत. महिलांना काय भोगावे लागले याचा विचार करूनच हादरायला होते. वेळ कमी असल्याने अनेक तक्रारींची नोंद मानवी हक्क आयोग घेऊ शकला नाही.

    मात्र,भाजपा आपल्या कार्यकर्त्यांवर वाऱ्यावर सोडणार नाही. भाजपाने आपल्या २५ हजारांहून अधिक बेघर कार्यकर्त्यांसाठी घरे बांधली आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी भाजपा कटिबध्द आहे.

    योगायोगाने तृणमूल कॉँग्रेसनेही बुधवारी आपला वार्षिक शहीद दिवस साजरा केला. 1993 मध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलीसांनी गोळीबार केला होता.

    यामध्ये १३ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी ममता बॅनर्जी युवक कॉँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी तृणमूल कॉँग्रेसतर्फे दर वर्षी शहीद दिवस साजरा केला जातो.

    Suvendu Adhikari alleges recollection of partition killings in two months of violence in Bengal

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य