विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर लोकसभा आणि राज्यसभेत नियमभंग करून प्रचंड गदारोळ करणाऱ्या 92 खासदारांनी लोकसभा आणि राज्यसभेतून आपले निलंबन ओढवून घेतले, पण त्यावेळी सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, शशी थरूर वगैरे खासदारांचा नंबर अजून का लागला नाही??, असा सवाल तयार झाला होता, पण त्या सवालाचे उत्तर आज मिळाले. Supriya Sule, Shashi Tharoor, Mohammad Faisal also suspended
92 खासदारांच्या निलंबनापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, मोहम्मद फैजल यांच्यासह शशी थरूर, कार्ती चिदंबरम, दानिश अली, डिंपल यादव आदी खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव केंद्रीय कायदा राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत मांडला. त्यामुळे खासदारांच्या निलंबनाचे दुसरे वर्तुळही पूर्ण होत आहे.
संसदेत काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीच्या विचारसरणीच्या अनुयायांनी घुसखोरी केली. लोकसभेत उड्या मारल्या. इतकेच नाही, तर संसदेच्या आवारात स्वतःला अग्निप्रतिबंधक जेल फासून पेटवून घेण्याचे देखील कारस्थान रचले. हा मुद्दा विरोधी पक्षांनी संसदेत पेटवला. लोकसभेच्या सभापतींनी या सर्व प्रकरणाची ताबडतोब दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली. तिच्या अहवालाची प्रतीक्षा आहे आणि त्यानंतर लोकसभेचे सभापती संसदेच्या सुरक्षा संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहेत.
परंतु त्यापूर्वीच लोकसभा आणि राज्यसभेतल्या सर्व विरोधी सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनीच निवेदन करावे. संसदेच्या संसदेतल्या घुसखोरीची जबाबदारी घेऊन अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, यासाठी दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला. हा गदारोळ असह्य झाल्यानंतरच राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनगड आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी टप्प्याटप्प्याने लोकसभा आणि राज्यसभा मिळून 92 खासदारांचे अधिवेशन कालापर्यंत निलंबन केले.
परंतु कालपर्यंत निलंबित झालेल्या 92 खासदारांमध्ये सुप्रिया सुळे, शशी थरूर, मोहम्मद फैजल, कार्ती चिदंबरम आदी खासदारांचा समावेश नव्हता. आज या खासदारांनी लोकसभेत गोंधळ घातला आणि स्वतःवर निलंबन ओढवून घेतले. सभापतींनी लोकसभेचे कामकाज दुपारी 2.00 वाजेपर्यंत स्थगित केले आहे. दुपारी 2.00 नंतर वर उल्लेख केलेल्या खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव सभापतींपुढे येईल.
तत्पूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वतःच्याच गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली निलंबित खासदारांनी जुन्या संसदेतल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले होते.
Supriya Sule, Shashi Tharoor, Mohammad Faisal also suspended
महत्वाच्या बातम्या
- एसटी बसस्थानकांचा MIDC कडून होणार कायापालट; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद, 600 कोटींचा सामंजस्य करार
- मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा; शेतकऱ्यांना 44 हजार 248 कोटींची मदत; शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृतिदलाची पुनर्स्थापना
- भारतात कोरोनामुळे एका दिवसात 5 जणांचा मृत्यू; 335 नवीन रुग्ण; केरळमध्ये नवा प्रकार सापडला
- नाफेड आणि NCCF महाराष्ट्राकडून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार