• Download App
    निवडणूक आयोगाची अव्वल कामगिरी; तब्बल 1 कोटी डुप्लिकेट नावे मतदार यादीतून डिलीट!!; प्रक्रिया पुढे राहणार सुरू!!Supreme Performance of the Election Commission; As many as 1 crore duplicate names deleted from voter list

    Big News : निवडणूक आयोगाची अव्वल कामगिरी; तब्बल 1 कोटी डुप्लिकेट नावे मतदार यादीतून डिलीट!!; प्रक्रिया पुढे राहणार सुरू!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने गेल्या साधारण 7 महिन्यांमध्ये संपूर्ण देशभरातील मतदार यादीची लोकसंख्यात्मकतेनुसार छाननी केली असून तब्बल 1 कोटी डुप्लिकेट नावे मतदार यादीतून डिलीट केली आहेत. ही माहिती या प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्याने दिली आहे. Supreme Performance of the Election Commission; As many as 1 crore duplicate names deleted from voter list

    मतदार यादीतील डुप्लिकेट नावे डिलीट करतानाच मतदान मतदार ओळखपत्रात देखील करेक्शन केले असून लोकसंख्यात्मक पातळीवर आणि प्रत्यक्ष फोटो आयडेंटिफिकेशन या निकषावर डुप्लिकेट नावे काढून टाकली आहेत. यामध्ये नाम साधर्म्य असणाऱ्या नावांबरोबरच दुबार एंट्रींचाही समावेश होता. त्यामुळे आता प्रत्येक मतदाराला आपले नाव एकाच ठिकाणी मतदार यादी दिसणार आहे. मतदारांचा व्यापक डिजिटल डाटा बेस तयार करण्यासाठी ही कार्यवाही करण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. डुप्लिकेट नावे काढून टाकण्यावर गेल्या 7 महिन्यात प्रामुख्याने भर दिला होता. त्यामुळे मतदार यादीत फार मोठी सुधारणा झाली आहे, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

    विरोधी पक्षांचा आक्षेप

    मतदार ओळखपत्र आधार कार्डला जोडण्याची सुविधा निवडणूक आयोगाने एक ऑगस्टपासून अधिक सोपी केली आहे या प्रक्रियेवर विरोधकांनी आक्षेप घेतला असून यामुळे लोकसंख्यात्मक मॅपिंग होईल आणि डाटा प्रायव्हसी जपली जाणार नाही, असा आरोप केला आहे.

    निवडणूक अधिकाऱ्यांनी डुप्लिकेट नावांचा आकडा दिला असून तो 1,191,191 एवढा आहे. याची छाननी करून त्यापैकी 927,853 एवढी डुप्लिकेट नावे मतदार यादीतून वगळली आहेत. ही प्रक्रिया आणखी सुरू आहे.

    मतदार यादी छाननी प्रक्रिया बूथ पातळीपर्यंत राबविली असून निवडणूक आयोगाने स्वतःहून कोणतेही नाव डिलीट केलेले नाही तसेच छाननी झाल्याशिवाय आणि संबंधिताला कळविल्याशिवाय ही प्रक्रिया पार पाडलेली नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे

    मतदार यादी मध्ये 31,889,422 एवढ्या संख्येच्या फोटोंमध्ये साम्य आढळले. याची छाननी करून त्यापैकी 9,800,412 एवढ्या मतदारांची नावे यादीतून वगळली. ही प्रक्रिया अजून सुरू आहे.

    94 कोटी मतदार

    मतदार यादी सुधारणा प्रक्रिया अधिक वेगाने करण्यात येणार असून देशात सध्या तब्बल 94 कोटी मतदार नोंदणी आहेत. मतदार ओळखपत्राला आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया जसजशी पुढे जाईल तसतसा मतदार यादी सुधारण्यात वेग येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

    Supreme Performance of the Election Commission; As many as 1 crore duplicate names deleted from voter list

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य