• Download App
    ‘’पराळी जाळणे बंद करा, अन्यथ...’’, दिल्ली-एनसीआरमध्ये वाढत्या प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयाचा कडक पवित्रा!|Supreme Courts strict stance on increasing pollution in Delhi NCR

    ‘’पराळी जाळणे बंद करा, अन्यथ…’’, दिल्ली-एनसीआरमध्ये वाढत्या प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयाचा कडक पवित्रा!

    • तुम्ही लोक एकमेकांवर आरोप करत आहात, मात्र हे राजकीय युद्धाचे मैदान नाही. असंही न्यायालयाने म्हटलं आहे

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत टीका केली आहे. दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणासाठी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारला जबाबदार धरले आहे.
    न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारले आणि सांगितले की, पंजाबमध्ये अजूनही पराळी जळत आहेत. तुम्ही लोक एकमेकांवर आरोप करत आहात, हे राजकीय युद्धाचे मैदान नाही. तुम्ही ते कसे करता हे आम्हाला माहीत नाही, हा तुमचा प्रश्न आहे, पण हे थांबलच पाहिजे.Supreme Courts strict stance on increasing pollution in Delhi NCR



    वाढत्या वायू प्रदूषणाबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय किशन कौल यांनी नाराजी व्यक्त करत दिल्लीत दरवर्षी ही समस्या सुरू होते, असे सांगितले.

    पराळी जाळल्यामुळे वायू प्रदूषण वाढू लागते. पंजाबमध्ये अजूनही पराळी जाळले जात आहे. हे थांबवल्याशिवाय प्रदूषणाची पातळी कमी होणार नाही. न्यायमूर्ती कौल म्हणाले की प्रत्येकजण येथे समस्या मोजण्यासाठी येतो. पण उपायांवर चर्चा करत नाही. दिल्लीत वायू प्रदूषणामुळे किती मुले आजारी पडत आहेत हे तुम्ही पाहत आहात.

    Supreme Courts strict stance on increasing pollution in Delhi NCR

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nirav Modi : फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते; युरोपियन-कोर्टात शेवटचा खटलाही हरला; गेल्या 7 वर्षांपासून लंडनच्या तुरुंगात बंद

    Microsoft : मायक्रोसॉफ्टने 4,800 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; एआय इन्फ्रास्ट्रक्चरवरील खर्च वाढल्यामुळे निर्णय; कंपनीचा शेअर 6 महिन्यांत 20% घसरला

    राम मंदिरातल्या चोरी बद्दल कांगावा करणारे काँग्रेस आणि समाजवादी नेते वफ्फची हजारो हेक्टर जमीन विकली गेली तेव्हा बोलले का??; योगी आदित्यनाथ यांचा परखड सवाल!!