• Download App
    देशभरातील विविध तुरुंगांमध्ये चार लाख कैदी, त्यांच्या आरोग्याबाबत मोठी चिंता।Supreme court worried abot health of prisnors

    देशभरातील विविध तुरुंगांमध्ये चार लाख कैदी, त्यांच्या आरोग्याबाबत मोठी चिंता

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सध्या देशभरातील विविध तुरुंगांमध्ये चार लाख कैदी असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहेत. न्यायालयाने या दोन्ही घटकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेताना तुरुंगातील कैद्यांची गर्दी कमी करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. मागील वर्षी जामीन अथवा पॅरोल मंजूर करण्यात आला त्यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आले आहेत. Supreme court worried abot health of prisnors



    सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज याबाबत सुनावणी झाली.
    विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या उच्चस्तरीय समित्यांनी ज्या कैद्यांना मागील वर्षी मार्चमध्ये जामीन मंजूर केला होता त्यांना तातडीने दिलासा देत त्यांची सुटका केली जावी असे न्यायालयाने म्हटले आहे. आम्ही आधी दिलेल्या आदेशांना अनुसरून ज्या कैद्यांना पॅरोल मंजूर करण्यात आला होता त्यांना आणखी नव्वद दिवसांचा पॅरोल मंजूर केला जावा, असेही न्यायालयाच्या ताज्या आदेशांत नमूद करण्यात आले आहे. न्यायालयाचा हा आदेश संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला.

    Supreme court worried abot health of prisnors

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    बैल गेला, झोपा केला; जनसुरक्षा विधेयक संमत झाल्यानंतर माओवाद्यांच्या नादी लागून काँग्रेसने self goal करून घेतला!!

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न