विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी कॉलेजियमने पाठविलेल्या नऊ नावांना केंद्राने मंजुरी दिली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण, न्यान. यू. यू. ललित, न्या. अजय माणिकराव खानविलकर, न्या(. धनंजय चंद्रचूड आणि न्या. एल. नागेश्वार राव यांच्या कॉलेजियमने १७ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात पदोन्नतीसाठी उच्च न्यायालयाच्या आठ न्यायाधीश, एक वरिष्ठ विधिज्ञ अशा नऊ जणांच्या नावांची शिफारस केली होती.Supreme court will get nine new judges
यामध्येव न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना (कर्नाटक), न्या. बेला एम. त्रिवेदी (गुजरात),न्या. हिमा कोहली (तेलंगण) या तीन महिलांचा समावेश आहे. या तिघींच्या नियुक्तीनंतर सध्याच्या न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांच्यासह सर्वोच्च न्यायालयात चार महिला न्यायाधीश असतील. न्यायाधीश नागरत्ना यांना भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होण्याचा मान मिळण्याची शक्यता असून सप्टेंबर २०२७ मध्ये त्यांची नियुक्ती होईल.
केंद्राने मंजूर केलेल्या यादीत न्या. सी. टी रवीकुमार (केरळ), न्या. एम.एम. सुंदरेश (मद्रास), न्या. अभय श्रीनिवास ओक (कर्नाटक), न्या, विक्रम नाथ (गुजरात), जितेंद्र कुमार माहेश्वुरी (सिक्कीम) आणि आणि वरिष्ठ विधिज्ञ व माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पी.एस. नरसिंह यांचाही समावेश आहे. न्याय व कायदे मंत्रालयातील सूत्रांनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांचा शपथविधी पुढील आठवड्यात होणार आहे.
Supreme court will get nine new judges
महत्त्वाच्या बातम्या
- अखेर महाविकास आघाडी सरकारने अनिल देशमुखांच्या डोक्यावरील हात काढला, रश्मी शुक्ला यांनी बनविलेला अहवाल सीबीआयलो देण्याची तयारी
- विश्व हिंदू सेनेच्या अध्यक्षाचे तालीबानी बोल, नारायण राणे यांचा शिरच्छेद करणाऱ्यास ५१ लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा
- अनुराधा पौडवाल भाजपाच्या वाटेवर, उत्तराखंड निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांना बांधली राखी
- केंद्रीय मंत्री पशुपतीकुमार पारस यांना जीवे मारण्याची धमकी, अमित शहा आणि नितीशकुमार यांना पत्र लिहून केली सुरक्षा वाढविण्याची मागणी