• Download App
    पतंजलीकडे 1 बोट दाखवता, पण 4 बोटे तुमच्याकडे आहेत; इंडियन मेडिकल असोसिएशनला (IMA) सुप्रीम कोर्टाने तडकावले!! Supreme Court tells Indian Medical Association that while it is pointing fingers at Patanjali, four fingers are pointing at them.

    पतंजलीकडे 1 बोट दाखवता, पण 4 बोटे तुमच्याकडे आहेत; इंडियन मेडिकल असोसिएशनला (IMA) सुप्रीम कोर्टाने तडकावले!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीच्या आयुर्वेदिक औषधांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीत संदर्भात सुप्रीम कोर्टाने आत्तापर्यंत बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना अनेकदा पट्ट्यात घेतले त्यांच्याकडून माफी मागून घेतली. Supreme Court tells Indian Medical Association that while it is pointing fingers at Patanjali, four fingers are pointing at them.

    पण आज पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव आणि पतंजली विरुद्ध केस ठोकणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात IMA ला देखील तडकावले. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्या म्हणून तुम्ही पतंजलीकडे 1 बोट दाखवता, पण त्याचवेळी 4 बोटे तुमच्या दिशेने आहेत हे विसरू नका. तुमच्या फिल्ड मधले डॉक्टर्स ऍलोपथीच्या औषधांविषयी अशीच आडमुठी भूमिका घेतात. अनेकदा पेशंटवर ऍलोपथीची औषधे लादतात, त्यावेळी तुम्ही काय करता??, मग त्यावेळी आम्ही तुमच्यावर कारवाई केली तर काय चुकेल??, अशा कठोर शब्दांमध्ये सुप्रीम कोर्टाने IMA ला तडकावले. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्ट IMA ला तडकावत असताना बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण हे कोर्टात हजर होते.

    आम्ही इथे पक्षपात करायला बसलो नाही. किंवा कोणत्याही एका पार्टीची बाजू उचलून धरायला बसलेलो नाही. आम्ही लोकांचे व्यापक हित बघूनच निर्णय करत असतो. लोकांची दिशाभूल होऊ नये. लोकांना सत्य काय ते समजले पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराच्या जपणुकीसाठीच आमची नेमणूक आणि आमची जबाबदारी आहे. ही जबाबदारी आम्ही व्यवस्थित पार पाडतो, असेही सुप्रीम कोर्टाने IMA तुला सुनावले.

    आत्तापर्यंत बाबा रामदेव आणि पतंजली प्रकरणात सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना कसे छापले त्या दोघांनी माफी मागण्याची तयारी दाखवल्यानंतरही सुप्रीम कोर्टाने त्यांना कसे फटकारले अशा स्वरूपाच्या बातम्या येत होत्या परंतु आज प्रथमच सुप्रीम कोर्टाने इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थातIMA या प्रतिष्ठेच्या संस्थेला देखील आपल्या पट्ट्यात घेतले आणि त्यांच्या डोळ्यांवरची धुंदी उतरवणारी वस्तुस्थिती मांडली. ऍलोपथीचे डॉक्टर्स पेशंटवर ऍलोपथीच्या औषधांचा मारा करतात. त्यांच्यावर फक्त ऍलोपथीचे औषधे लादतात. हे सुप्रीम कोर्टाने IMA सारख्या प्रतिष्ठित संस्थेला सुनावल्याने IMA काळी बाजूही ऑन रेकॉर्ड आली आहे.

    Supreme Court tells Indian Medical Association that while it is pointing fingers at Patanjali, four fingers are pointing at them.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट