• Download App
    ममतांच्या शिक्षक भरती घोटाळ्याला सुप्रीम कोर्टाचा Supreme Court slams Mamata's teacher recruitment scam; Time for 25000 teachers to lose their jobs!!

    ममतांच्या शिक्षक भरती घोटाळ्याला सुप्रीम कोर्टाचा दणका; 25000 शिक्षकांना नोकऱ्या गमवायची वेळ!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने 2016 साली केलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याला सुप्रीम कोर्टाने आज जबरदस्त दणका दिला. त्यामुळे तब्बल 25000 शिक्षकांना नोकऱ्या गमवायची वेळ आली. शिक्षक भरती प्रक्रियेत सरकारने नियुक्त्या आणि बदल्यांमध्ये वशिलेबाजी, लाचखोरी असे गैरव्यवहार आणि गैरप्रकार केले. रजिस्टर बदलली. नोंदींमध्ये फेरफार केले. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया अवैध ठरवून रद्द करून टाकली. सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने ममता बॅनर्जींच्या सरकारला या निकालातून फटकारले.Supreme Court slams Mamata’s teacher recruitment scam; Time for 25000 teachers to lose their jobs!!



    पश्चिम बंगाल मध्ये 2016 साली ममता बॅनर्जींच्या सरकारने सरकारी आणि सरकार अनुदानित शाळांमध्ये 24640 शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवली. 24640 शिक्षक आणि उपशिक्षकांच्या पदांसाठी तब्बल 23 लाख उमेदवारांनी अर्ज केले. प्रत्यक्षात भरती प्रक्रियेत सरकारने 25753 जणांना नियुक्तीपत्रे वाटली. त्यामुळे 1113 पदांची जास्त नियुक्तीपत्रे वाटली गेली. यातून शिक्षक भरती घोटाळा उघड झाला. यात वशिलेबाजी, लाचखोरी, नातेवाईकांची आणि मित्रांची भरती असले सगळे प्रकार त्याने उघडकीस आले. सीबीआयने अनेक ठिकाणी छापे घालून या घोटाळ्याचे धागेदोरे उलगडून ते कोलकत्ता हायकोर्टात आणि नंतर सुप्रीम कोर्टात मांडले.

    या सगळ्याचा परिणाम म्हणून सुप्रीम कोर्टाने सगळे शिक्षक भरती प्रक्रिया रद्द केली. त्यामुळे 25753 शिक्षक आणि उपशिक्षकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. सरकारच्या अन्य खात्यांमधून शिक्षक म्हणून भरती झालेल्यांना सुप्रीम कोर्टाने मूळ खात्यामध्ये जाऊन नोकरी करायची मुभा दिली. पण ही संख्या फारच किरकोळ निघाली. त्याचबरोबर एका दिव्यांग व्यक्तीला नोकरी चालू ठेवायची संधी दिली अन्य दिव्यांग व्यक्तींच्या नोकरी संदर्भात काही सवलती द्यायला सरकारला सांगितले.

    Supreme Court slams Mamata’s teacher recruitment scam; Time for 25000 teachers to lose their jobs!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!