विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोणत्या पक्षाला कोणी किती पैसे दिले या संदर्भातले इलेक्ट्रोरल बाँड्सचे सगळे तपशील सादर करा, असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला दिले आहेत. इलेक्ट्रोरल बाँड्सबाबत अपूर्ण माहिती दिल्याने सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला फटकारले. कोणी कोणत्या पक्षाला रक्कम दिली हे जाहीर करावे, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला सोमवारपर्यंत वेळ दिला आहे. सुप्रीम कोर्टात निवडणूक रोख्यांसंबंधी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे. Supreme Court says SBI has not disclosed the electoral bonds
स्टेट बँकेने इलेक्ट्रोरल बाँड्स संदर्भात जो डेटा सोपवला आहे त्यावर अल्फा न्यूमरिकल बाँड नंबर देण्यात आलेला नाही. प्रत्यक्षात बँकेने ते खुलासे करायला हवे होते, असे निरीक्षण सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी नोंदविले. यावर निवडणूक आयोगाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी युक्तिवाद केला की, सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक रोख्यांशी संबंधित काही डेटा सीलबंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयाकडे सुपूर्द केला होता. गोपनीयता राखण्यासाठी आयोगाने त्याची कोणतीही प्रत स्वतःकडे ठेवली नाही. अशा परिस्थितीत, निवडणूक आयोगाला वेबसाइटवर संपूर्ण तपशील अपलोड करण्यासाठी न्यायालयाकडून सीलबंद लिफाफे परत हवे आहेत.
निवडणूक आयोगाचा जो डेटा आमच्याकडे आहे तो स्कॅन करून डिजिटल स्वरूपात ठेवला जाईल. उद्यापर्यंत रजिस्टार हे काम करतील. त्यानंतर मूळ डेटा आयोगाकडे सुपूर्द केला जाईल. जेणेकरुन तो आयोगाच्या वेबसाइटवर अपलोडही करता येईल.
स्टेट बँक ऑफ इंडियाला इलेक्ट्रोरल बाँड्सचे सर्व तपशील सादर करायला सांगितले होते. पण एसबीआयने बाँड नंबरची माहिती दिलेली नाही. या मुद्द्यावर कोर्टाने नोटीस जारी केली असून, सोमवारपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. हा निर्णय महत्वाचा आहे कारण बाँड नंबरवरुनच कोणी कोणत्या पक्षाला नेमका किती निधी दिला, याची माहिती मिळू शकेल.
Supreme Court says SBI has not disclosed the electoral bonds
महत्वाच्या बातम्या
- देशभरात पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी स्वस्त; आज सकाळी 6 वाजल्यापासून नवीन दर लागू; 22 महिन्यांनंतर किमती घटल्या
- ममतांच्या कपाळावर आणि नाकाला 4 टाके पडले; बंगालच्या मुख्यमंत्र्यांना कोणीतरी धक्का दिला; कोलकाता पोलिसांचा तपास सुरू
- SBI इलेक्ट्रोरल बाँड्स : राजकीय पक्षांचे देणगीदार सगळेच बडे उद्योगपती; अपवाद नाही त्याला कोणी!!
- भाजपकडून जास्त जागा खेचण्यासाठी अजितदादा + शिंदेंची घासाघाशी; पण नाराज नेते पक्षात टिकवताना घामफुटी!!