• Download App
    सुप्रीम कोर्टाने NEET SS एक्झाम पॅटर्नमध्ये बदल केल्यावरून केंद्र, NBE आणि वैद्यकीय परिषदेला फटकारले । Supreme Court pulls up the Centre, NBE and National Medical Commission for Change Exam pattern of NEET SS

    सुप्रीम कोर्टाने NEET SS एक्झाम पॅटर्नमध्ये बदल केल्यावरून केंद्र, NBE आणि वैद्यकीय परिषदेला फटकारले

    NEET SS : पोस्ट ग्रॅज्युएट नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट-सुपर स्पेशालिटी (NEET-SS) 2021 च्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये शेवटच्या क्षणी बदल केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र, राष्ट्रीय परीक्षा मंडळ आणि राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेला फटकारले आहे. Supreme Court pulls up the Centre, NBE and National Medical Commission for Change Exam pattern of NEET SS


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पोस्ट ग्रॅज्युएट नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट-सुपर स्पेशालिटी (NEET-SS) 2021 च्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये शेवटच्या क्षणी बदल केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र, राष्ट्रीय परीक्षा मंडळ आणि राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेला फटकारले आहे.

    सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, “सत्तेच्या खेळात या तरुण डॉक्टरांना फुटबॉल समजू नका. आम्ही या डॉक्टरांना असंवेदनशील नोकरशहांच्या दयेवर सोडू शकत नाही. सरकारने आपले घर दुरुस्त करावे. तुमच्या हातात अधिकार आहेत म्हणून तुम्ही त्यांचा कोणत्याही प्रकारे वापर करू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. हे त्यांच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचे आहे. आता तुम्ही शेवटच्या क्षणी बदल करू शकत नाहीत.”

    सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी

    न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना म्हणाल्या, “शेवटच्या क्षणी झालेल्या बदलांमुळे या तरुण डॉक्टरांची दिशाभूल होऊ शकते.” न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड म्हणाले, “तरुण डॉक्टरांशी संवेदनशीलतेने वागा. NMC (राष्ट्रीय वैद्यकीय आयोग) काय करत आहे? डॉक्टरांच्या जीवनाशी कसे वागत आहात. तुम्ही नोटीस बजावता आणि नंतर पॅटर्न बदलता? विद्यार्थी सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रमांची तयारी महिन्यांपूर्वीच सुरू करतात. परीक्षेच्या ऐन आधी बदलण्याची गरज का आहे? तुम्ही पुढच्या वर्षापासून बदल का करू शकत नाही?”

    Supreme Court pulls up the Centre, NBE and National Medical Commission for Change Exam pattern of NEET SS

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक