विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिपोर्टवर SEBI च चौकशी करेल. त्या चौकशीवर शंका घेऊन SEBI बदनाम करण्याचे काहीही कारण नाही उर्वरित दोन प्रकरणांची चौकशी 3 महिन्यांमध्ये करून SEBI अहवाल देईल. अदानी प्रकरणात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडून चौकशी आणि तपासाची गरज नाही, असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. या निकालावर गौतम अदानी यांनी “सत्यमेव जयते”, अशी पोस्ट करून राहुल गांधींना डिवचले. Supreme Court Judgment on Hindenburg Report
गौतम अदानी यांनी हिंडेनबर्ग खटल्यातील सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे स्वागत केले आहे. निकालावर मत व्यक्त करताना त्यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सत्याचा विजय झाला आहे.” अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांवर न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर काही मिनिटांमध्ये त्यांनी ही पोस्ट केली.
पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून असे दिसून आले आहे की, सत्याचा विजय झाला आहे. सत्यमेव जयते. जे आमच्या पाठीशी उभे राहिले त्यांचा मी ऋणी आहे. भारताच्या विकासात आमचे योगदान कायम राहील. जय हिंद!!
SEBI ची बदनामी करण्याचे कारण नाही
हिंडेनबर्ग प्रकरणाबाबत मोठा निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया SEBI च्या तपासात कोणत्याही त्रुटी नसल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत या प्रकरणाचा तपास स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमकडून केला जाणार नाही.
SEBI ने नियमानुसार तपास केला आहे. SEBI ने आतापर्यंत 22 आरोपांची चौकशी केली आहे, तर 2 आरोपांची चौकशी बाकी आहे. उर्वरित प्रकरणांचा तपास 3 महिन्यांत पूर्ण करावा. अदानी समूहाविरुद्धच्या आरोपांची चौकशी करणार्या SEBI ला बदनाम करण्याचे कोणतेही कारण नाही, असे परखड निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदविले सुप्रीम कोर्टाने 24 नोव्हेंबर 2023 रोजी हा निकाल राखून ठेवला होता.
अदानी समूहावर काय आरोप होते?
हिंडेनबर्ग अहवालात गौतम अदानी आणि त्यांच्या अदानी समूहाने चुकीच्या पद्धतीने अदानी शेअर्समध्ये पैसे गुंतवले. शेअरच्या किंमतीत फेरफार करून गुंतवणूकदारांची फसवणूक केली.
अदानी कंपन्यांच्या शेअर्समधील गुंतवणुकीच्या तपासासोबतच कोणाला काय फायदा झाला??, हेही तपासावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी सुप्रीम कोर्टात केली होती.
राहुल गांधींना डिवचले
सुप्रीम कोर्टाच्या या निकालावरच गौतम अदानी यांनी “सत्यमेव जयते” असे ट्विट करून राहुल गांधींना डिवचले. कारण राहुल गांधींनीच अदानी समूहावर एकापाठोपाठ एक आरोप केले होते. गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकमेकांशी व्यावहारिक संबंध आहेत, तेच एकमेकांना मदत करून देशाची अर्थव्यवस्था बुडवत आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला होता. त्या प्रत्येक वेळी ते सत्यमेव जयते किंवा अन्य वचनांचा आधार घेत सोशल मीडियावर पोस्ट लिहित होते. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर गौतम अदानी यांनी त्याचाच आधार घेत “सत्यमेव जयते” ही पोस्ट करून राहुल गांधींना डिवचले.
Supreme Court Judgment on Hindenburg Report
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : हिट अँड रनचा वाद काय? भारतातल्या कायद्याला विरोध का? परदेशात कोणते कायदे? वाचा सविस्तर
- ‘अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार’, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा नवा नारा!
- ‘हिट अँड रन’ कायद्याची सध्या अंमलबजावणी होणार नाही, संप मागे घेण्याचे आवाहन!
- मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व्हेक्षणाचे काम बिनचूक आणि कालबद्धरितीने व्हावे