• Download App
    सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनाही कोरोनाची लागण, त्यांच्या पीठानेच केली होती कोविड टास्क फोर्सची स्थापना । supreme court judge Justice DY Chandrachud Tested Positive For Covid 19

    सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांना कोरोनाची लागण, नुकतीच केली होती कोविड टास्क फोर्सची स्थापना

    Justice DY Chandrachud : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, कोरोनाने आता सर्वोच्च न्यायालयातही शिरकाव केल्याचे समोर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. supreme court judge Justice DY Chandrachud Tested Positive For Covid 19


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, कोरोनाने आता सर्वोच्च न्यायालयातही शिरकाव केल्याचे समोर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.

    न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या स्टाफमधील एक कर्मचारी याआधी संक्रमित आढळला होता. जस्टिस चंद्रचूड सातत्याने अनेक महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी करत होते. यामध्ये निवडणुका, कुंभ आणि ऑक्सिजन पुरवठासारख्या महत्त्वाच्या प्रकरणांचा समावेश होता. त्यांनी या प्रकरणांवर सोमवारीच सुनावणी घेतली होती.

    तत्पूर्वी, शनिवारी जस्टिस चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठानेच औषधे आणि ऑक्सिजन पुरवठ्यावरून एका टास्क फोर्सची स्थापना केली होती. बार अँड बेंच वेबसाइटनुसार, त्यांचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर कोरोना प्रकरणांवर गुरुवारी होणारी सुनावणी टळली आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यातही सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाली होती.

    supreme court judge Justice DY Chandrachud Tested Positive For Covid 19

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले