• Download App
    केजरीवाल प्रचार + मतदानापुरते बाहेर; पण लोकसभेच्या निकालापूर्वी पुन्हा तुरुंगात!! Supreme Court granted interim bail to Arvind Kejriwal till June 1

    केजरीवाल प्रचार + मतदानापुरते बाहेर; पण लोकसभेच्या निकालापूर्वी पुन्हा तुरुंगात!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीच्या दारू घोटाळ्यातले मुख्य आरोपी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर प्रचार आणि मतदानापूर्वी बाहेर येणार आहेत, पण लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वी ते पुन्हा तुरुंगवासी होणार आहेत. Supreme Court granted interim bail to Arvind Kejriwal till June 1

    सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवालांना 1 जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केल्याने तसेच त्यांना 2 जून रोजी पोलिसांसमोर शरण येण्याची अट घातल्याने हे शक्य होणार आहे.

    मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दारू घोटाळ्याच्या आरोपाखाली 1 एप्रिल पासून तुरुंगात होते. प्रत्येक आठवड्याला त्यांच्या जामीनावर वेगवेगळ्या कोर्टांमध्ये सुनावणी झाली. परंतु प्रत्येक कोर्टाने त्यांचा जामीन नाकारला. दरम्यानच्या काळात लोकसभेच्या निवडणुकीतले मतदानाचे पहिले 3 टप्पे पूर्ण झाले. उरलेले 4 टप्पे टप्पे पूर्ण होणार आहेत. त्यामध्ये पंजाब आणि दिल्ली अशा दोन आम आदमी पार्टीच्या राजवटी असलेल्या राज्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल आपल्या अंतिम जामीनाच्या काळात या 2 राज्यांमध्ये प्रचार करू शकतील, तसेच त्यांना हवे तर इतर राज्यांमध्ये पण जाऊ शकतील. पत्रकार परिषदा घेऊ शकतील. तेवढी मुभा त्यांना सुप्रीम कोर्टाने दिली आहे.

    लोकसभेसाठी 25 मे रोजी दिल्लीत मतदान होणार आहे. दिल्लीत लोकसभेच्या 6 जागा आहेत. अरविंद केजरीवाल यांना 1 जून पर्यंत अंतरिम जामीन मिळाला. 2 जून रोजी त्यांना पुन्हा पोलिसांपुढे आत्मसमर्पण कराव लागेल.

    जस्टिस संजीव खन्ना आणि जस्टिस दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने शुक्रवारी हा निर्णय दिला. तुरुंगातून सुटल्यानंतर अरविंद केजरीवाल निवडणूक प्रचारात सहभागी होऊ शकतात. पत्रकार परिषद घेऊ शकतात. केजरीवाल आम आदमी पार्टीचा मोठा चेहरा आहेत. केजरीवाल प्रचारात उतरल्याने पक्ष, कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश निर्माण होणार आहे. दारु घोटाळ्यात ED ने केजरीवालाना 21 मार्च रोजी अटक केली होती.

    Supreme Court granted interim bail to Arvind Kejriwal till June 1

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते