विशेष प्रतिनिधी
मुंबई : दहशतवादी दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी मनी लॉन्ड्रीग गैरव्यवहार केल्याबद्दल ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना दीड वर्षांनी वैद्यकीय कारणांसाठी जामीन मिळाला आहे. supreme court grant bail nawab malik supreme court medical reason
ते अद्याप तुरुंगातून बाहेर आलेले नाहीत. त्यांच्या तुरुंगातून बाहेर येण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू होईल. पण त्याआधीच केवळ अंतरिम जामीन मंजूर झाला म्हणून राष्ट्रवादीच्या अजितनिष्ठ समर्थकांनी अजित पवारांच्या मुंबईतल्या कार्यालयाबाहेर फटाके फोडले आहेत. नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक हिने काही दिवसांपूर्वीच अजित पवारांची मंत्रालयात येऊन भेट घेतली होती. त्यामुळे नवाब मलिक यांचा राजकीय कल शरद पवारांपेक्षा अजित पवारांकडेच आहे, असे त्यातून मानले जाते. अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर सुमारे सव्वा महिन्यांनी नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणासाठी अंतरिम का होईना जामीन मिळाला, याला विशेष महत्त्व आहे.
– तुरुंगातून बाहेर येणार असले तरी…
नवाब मलिक दोन महिन्यांसाठी वैद्यकीय कारणांसाठी तुरुंगाबाहेर येणार आहेत. तरीदेखील त्यांच्यावरचा मनी लॉन्ड्रीगचा खटला पीएमएलए कोर्टात सुरूच राहणार आहे. नवाब मलिक यांच्या तब्येती संदर्भातले अपडेट त्यांना पीएमएलए कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत सगळीकडे सादर करावे लागणार आहेत. त्यामुळे नवाब मलिक तुरुंगातून दोन महिन्यांसाठी सुटले असले तरी ते पुन्हा तुरुंगात जाणारच नाही, त्याची कोणीही खात्री देऊ शकत नाही. त्याचबरोबर ते लगेच राजकारण सुरू करतील आणि रोजच्या पत्रकार परिषदा सुरू करतील, हा समाजही भ्रामक ठरण्याची शक्यता आहे.
supreme court grant bail nawab malik supreme court medical reason
महत्वाच्या बातम्या
- रशियाकडून ४७ वर्षांनंतर मोठी चांद्रयान मोहीम ‘Luna 25’ लाँच
- तामिळनाडू : मनी लाँड्रिंग प्रकरणात मंत्री व्ही. सेंथील बालाजीच्या निकटवर्तीयाची 30 कोटींची जमीन जप्त!
- मोदींनी उल्लेख केलेले, इंदिरा गांधींनी घोडचूक केलेले कच्छथिवू नेमके आहे काय??; त्याचे स्ट्रॅटेजिक महत्त्व काय??
- …’या’ विधानामुळे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींवर लोकसभेतून निलंबनाची कारवाई!