• Download App
    ऑक्सिजन निर्मिती ही ‘राष्ट्रीय गरज’, सर्वोच्च न्यायालयाचा स्टरलाइटला हिरवा कंदील|Supreme court gives green signal to starllite plant

    ऑक्सिजन निर्मिती ही ‘राष्ट्रीय गरज’, सर्वोच्च न्यायालयाचा स्टरलाइटला हिरवा कंदील

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : तमिळनाडूमधील तुतिकोरीनमधील वेदांता कंपनीचा बंद असलेला स्टरलाइट कॉपर प्रकल्प ऑक्सिजनच्या उत्पादनासाठी पुन्हा सुरू करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मान्यता दिली. ऑक्सिजनची ‘राष्ट्रीय गरज’ पाहता ही परवानगी दिल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.Supreme court gives green signal to starllite plant

    तमिळनाडू सरकारने काल सर्वपक्षीय बैठकीत ऑक्सिजन तयार करण्यासाठी स्टरलाइट प्रकल्प चार महिन्यांपर्यंत सुरु ठेवण्यास ‘वेदांता’ला परवानगी देण्यात आली. राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रकल्पात रोज एक हजार टन ऑक्सिजन तयार करण्याची मंजुरी दिली आहे.



    न्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. नागेश्वुर राव आणि न्या. एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. ‘‘केवळ ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी हा प्रकल्प पुन्हा सुरू करता येईल. आम्ही फक्त ऑक्सिजनच्या उत्पादनासाठी मंजुरी देत आहोत.

    तांबे वितळवण्यासाठी वा अन्य उत्पादनासाठी ‘वेदांता’ला या आदेशाचा वापर करता येणार नाही,’’ असे खंडपीठाने स्पष्ट केले. देशासमोर राष्ट्रीय संकट उभे असल्याने वेदांता कंपनीच्या ऑक्सिजन निर्मितीवर कोणतेही राजकारण करू नये, असेही न्यायालयाने सुनावले.

    Supreme court gives green signal to starllite plant3

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!