• Download App
    Ranveer Allahabadia रणवीर‌ अलाहाबादिया बरळला, त्याच्या मनातली घाण ओकला; सुप्रीम कोर्टाचे तिखट ताशेरे!!

    Ranveer Allahabadia रणवीर‌ अलाहाबादिया बरळला, त्याच्या मनातली घाण ओकला; सुप्रीम कोर्टाचे तिखट ताशेरे!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : युट्युबर रणवीर अलाहाबादिया याच्या मनात घाणच होती आणि तो ती संबंधित कार्यक्रमात ओकला अशा तिखट शब्दांमध्ये सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर ताशेरे ओढले. इतकेच नाही तर आपण खूप लोकप्रिय आहोत म्हणून वाटेल ते बरळू शकतो आणि समाजाला ते आवडेलच असे हे उथळ लोक गृहीत धरतात, जे पूर्णपणे चूक आहे, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने रणवीरचे कान पिरगळले. Ranveer Allahabadia

    “इंडियाज गॉट लेटेंट” या कार्यक्रमात रणवीर अलाहाबादिया याने आई-वडिलांसंदर्भात अश्लील शेरेबाजी केली होती. त्यामुळे त्याच्या विरोधात आणि शो च्या निर्मात्यांविरोधात प्रचंड संताप उसळला होता. मुंबई पोलिसांनी त्या शोची दखल घेऊन सगळ्यांविरुद्ध एफआयआर नोंदविला. सगळ्यांना चौकशीसाठी समन्स काढले. राष्ट्रीय महिला आयोगाने देखील संबंधितांना चौकशीचे समन्स काढले. परंतु ७ आरोपींपैकी एकही आरोपी कुठल्याच चौकशीसाठी फिरकला नाही. वेगवेगळी कारणे देऊन चौकशीला सामोरे जाणे टाळत राहिला.

    रणवीर अलाहाबादिया देखील चौकशीला सामोरा गेला नाही. उलट रडणारा व्हिडिओ जारी करून त्याने आपल्याला मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावा केला. आपल्या आईच्या दवाखान्यात पेशंट म्हणून घुसलेल्या लोकांनी धमकी दिली, असे तो म्हणाला. पण पण तो आपली अटक आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये वकिलामार्फत पोहोचला. माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा मुलगा अभिनव चंद्रपूर रणवीरचा वकील आहे.

    सुप्रीम कोर्टाने आज त्या सगळ्या प्रकरणावर सुनावणी घेताना रणवीर अलाहाबादिया विषयी तिखट शब्दांमध्ये ताशेरे ओढले. रणवीरच्या मनामध्ये घाणच होती. ती तो त्या कार्यक्रमात ओकला. आपण लोकप्रिय झालो म्हणजे आपल्याला वाटेल ते बोलण्याचा अधिकार आहे. आपण वाटेल ते बरळू शकतो. समाजाला ते आवडते, असे या लोकांना वाटते. पण हे पूर्णपणे चूक आहे. रणवीर जे बोलला त्यामुळे आई-वडिलांची, भावा-बहिणींची मान शरमेने झुकली. रणवीरच्या कमेंट या बिलकुलच सभ्य नव्हत्या. त्या खालच्या पातळीवरच्याच होत्या. त्यांचे समर्थन होऊ शकत नाही. उलट त्यावर समाजातून जी टीका झाली ती योग्यच आहे, असे सुप्रीम कोर्टाने रणवीरला सुनावले. रणवीरच्या जीविताला धोका असेल, तर कायद्यातल्या तरतुदीनुसार विविध संरक्षण संस्था त्याची दखल घेतील असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

    Supreme Court expresses displeasure on the remarks Of YouTuber and podcaster Ranveer Allahabadia

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र