वृत्तसंस्था
टोकियो : टोकियो पँराऑलिम्पिकमध्ये भारतीय दिव्यांग खेळाडूंनी अतिशय चमकदार कामगिरी करत पदकांची लयलूट चालू ठेवली आहे. अवनी लेखरा हिने एअर पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक मिळवल्यानंतर भारताने आणखीन तीन पदकांची कमाई केली आहे. देवेंद्र झांझरिया याने भालाफेकीत रौप्यपदक मिळवले. त्याच प्रकारात सुंदर सिंग याने ब्रॉंझपदक पटकावले तर थाळीफेकीत योगेश कथूनिया याने रौप्य पदक पटकावले. “Superb performance by Devendra Jhajharia! One of our most experienced athletes wins a Silver medal.”
या पदकांच्या लयलुटीमुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पथकाचा खूप बोलबाला झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले सर्व खेळाडूंच्या घरी जोरदार सेलिब्रेशन झाले.
योगेश कथुनिया हरियानातील बहादूरगडचा रहिवासी आहे. योगेशने थाळीफेक रौप्यपदक मिळवतात तो राहत असलेल्या गल्लीत जबरदस्त सेलिब्रेशन झाले. माझ्या मुलाने कमावलेले रौप्य पदक हे माझ्यासाठी सुवर्णपदकाचा आहे, अशा भावना योगेश ची आई मीना देवी यांनी व्यक्त केल्या आहेत.
“Superb performance by Devendra Jhajharia! One of our most experienced athletes wins a Silver medal.”
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात गणेशोत्सवात रात्रीची कडक संचारबंदी; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा इशारा
- तालिबानने भारताशी संबंधांची केली मागणी , चाबहार बंदरालाही सांगितले महत्त्वाचे , काय सांगितले ते जाणून घ्या
- खासदार गोपाळ शेट्टी यांची माणुसकी, आफ्रिकेवरून विमानतळावर आलेल्या प्रवाश्याच्या सुटकेसाठी चक्क पहाटे आले धावून
- रात्रभर टीव्ही चालू होता म्हणून नवर्याने बायकोचा गळा दाबून केली हत्या