• Download App
    ओमानचे सुलतान भारतात अन् तिकडे चीन, पाकिस्तान तणावात! Sultan of Oman in India and there China Pakistan in tension

    ओमानचे सुलतान भारतात अन् तिकडे चीन, पाकिस्तान तणावात!

    जाणून घ्या मोदींनी हैथम बिन तारिक यांच्याशी काय केली चर्चा?

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अरब, आखाती आणि मुस्लिम देशांसोबतचे भारताचे संबंध सातत्याने नवनवीन बळ प्राप्त करत आहेत. यामुळे भारताच्या शत्रूंची झोप उडाली आहे. दरम्यान, भारत आणि ओमानमधील संबंधही नव्या वाटेवर आहेत. ओमानचे सुलतान सध्या दिल्लीत असून त्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ओमान सारख्या देशांचे भारतासोबतचे संबंध मजबूत होत असल्याचे पाहून पाकिस्तान आणि चीन चिंतेत आहेत. Sultan of Oman in India and there China Pakistan in tension

    चीनला आपला व्यापार ढासळताना दिसत असताना आणि अरब, आखाती आणि मुस्लिम देशांमध्ये भारताची पकड मजबूत होत असताना, धर्माचा मुद्दा उपस्थित करूनही पाकिस्तानला या देशांकडून कोणत्याही प्रकारे फारसे महत्त्व मिळाले नाही.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी व्यापार आणि गुंतवणुकीसह विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावर चर्चा केली. ओमानचे सुलतान शुक्रवारी दिल्लीत आले, आखाती देशाचे सर्वोच्च नेते म्हणून त्यांची ही पहिलीच भारत भेट आहे.

    परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एका पोस्टमध्ये सांगितले की, हैथम बिन तारिक यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले, ज्यामुळे द्विपक्षीय चर्चेसाठीचा मंच निर्माण झाला. तर मोदी म्हणाले, “अजेंड्यात द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणे आणि दोन्ही देशांमधील भविष्यातील सहकार्याचा मार्ग मोकळा करणे समाविष्ट आहे.” सुलतान बिन तारिक यांचे सकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत करण्यात आले.

    या आठवड्याच्या सुरुवातीला ओमानच्या सुलतानच्या भेटीची घोषणा करताना परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की, “महामहिम सुलतान हैथम बिन तारिक यांची ही पहिली भारत भेट भारत आणि ओमान यांच्यातील राजनैतिक संबंधांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

    Sultan of Oman in India and there China Pakistan in tension

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट