• Download App
    हिमाचलमध्ये सुखविंदर सिंह सुक्खू यांचे नाव पुढे येताच काँग्रेस हायकमांड विरुद्ध प्रतिभा सिंह समर्थकांची नारेबाजी Sukhwinder Singh Sukkhu came up in Himachal, Pratibha Singh supporters raised slogans against the Congress high command

    हिमाचलमध्ये सुखविंदर सिंह सुक्खू यांचे नाव पुढे येताच काँग्रेस हायकमांड विरुद्ध प्रतिभा सिंह समर्थकांची नारेबाजी

    वृत्तसंस्था

    शिमला : हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपवर मात करून सत्ता खेचून घेतले असली तरी मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा मात्र थांबायला तयार नाही. काँग्रेस हायकमांडने हिमाचलच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुखविंदर सिंग सुक्खू यांचे नाव पुढे आणत माजी मुख्यमंत्री कै. वीरभद्र सिंह यांच्या पत्नी खासदार प्रतिभा सिंह यांच्या समर्थकांनी हाय कमांड विरुद्धच जोरदार घोषणाबाजी केली आहे. प्रतिभा सिंह यांच्या समर्थक आमदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे हिमाचल प्रदेश काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक देखील लांबली आहे. Sukhwinder Singh Sukkhu came up in Himachal, Pratibha Singh supporters raised slogans against the Congress high command

    काँग्रेस हायकमांडने पक्ष निरीक्षकांना शिमल्यात पाठवून काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांचे मत जाणून घेतले. त्यानंतर आज दिवसभर राजकीय खल करून हिमाचल प्रदेश काँग्रेस प्रचार प्रमुख सुखविंदर सिंग सुख यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित केले, पण हे समजताच त्याची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच हिमाचल प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांच्या समर्थकांनी सुक्खू-सुक्खू नही चलेगा, हायकमांड हाय हाय रानीसाहेबा जिंदाबाद अशा जोरदार घोषणा दिल्या आहेत. इतकेच नाही, तर प्रतिभा सिंह यांचे समर्थक आमदार नाराज झाले आहेत. त्यामुळे ते कोणत्याही क्षणी वेगळी भूमिका घेतील का काय अशी भीती काँग्रेस हायकमांडच्या मनात आली आहे. त्यामुळे काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक देखील नियोजित वेळेपेक्षा लांबणीवर पडत चालली आहे.

    सुखविंदर सिंग सुख यांचे अधिकृत घोषणा काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री पदासाठी केली तरी काँग्रेस विधिमंडळ पक्ष हा एकजिनसी राहिलेला नाही. काँग्रेसने जरी विधानसभा निवडणुकीत 40 आमदार निवडून आणले आणून बहुमत प्राप्त केले असले तरी काँग्रेस पक्षात फूट पडण्याची शक्यता दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Sukhwinder Singh Sukkhu came up in Himachal, Pratibha Singh supporters raised slogans against the Congress high command.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज