अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताच भाजप आज विधानसभेत अविश्वास प्रस्ताव आणणार आहे.
विशेष प्रतिनिधी
शिमला : राज्यसभेची जागा गमावल्यानंतर हिमाचलच्या काँग्रेस सरकारवर संकटाचे ढग दाटले आहेत. भाजप राज्यपालांकडे सुखू सरकारची बहुमत चाचणी करण्याची मागणी करत आहे. राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांना बोलावले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताच भाजप आज विधानसभेत अविश्वास प्रस्ताव आणणार आहे.Sukhwinder Singh Sukhus government of Congress in Himachal is in crisis!
सध्या हिमाचल प्रदेश काँग्रेसचे 6 आमदार पंचकुलामध्ये आहेत. कडेकोट बंदोबस्तात त्यांना सेक्टर ३ येथील हॉटेल हॉलिडे इनमध्ये ठेवण्यात आले आहे. हे आमदार कधीही हिमाचल प्रदेशला रवाना होऊ शकतात. हिमाचल प्रदेश भाजपचे अध्यक्ष राजीव बिंदल यांनीही या आमदारांची भेट घेतली आहे.
दरम्यान, काँग्रेसनेही डॅमेज कंट्रोल करताना दोन निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. काँग्रेसला हिमाचल सरकार पडण्याची भीती आहे. वास्तविक, राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगमुळे बीडीपी आणि काँग्रेसला समसमान मते मिळाली, त्यानंतर चिठ्ठ्या टाकून विजय-पराजय ठरवावा लागला. अभिषेक मनू सिंघवी यांच्याविरोधात हर्ष महाजन विजयी झाले आहेत.
Sukhwinder Singh Sukhus government of Congress in Himachal is in crisis!
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत कुर्ला येथे प्रकल्पबाधितांना 961 घरांचे मुखमंत्र्यांच्या हस्ते वाटप!!
- CAA मार्चमध्ये लागू होणार? ; लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा घेणार निर्णय!
- EDने केजरीवालांना पाठवले आठवे समन्स, ‘या’ दिवशी चौकशीसाठी बोलावले
- शिवराळ भाषा जरांगेंची, पण पवारांचा फडणवीसांवरच असभ्यतेचा आरोप; अप्रत्यक्षपणे घेतली जरांगेंची बाजू!