• Download App
    काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या घरात महिलेची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिले मला तुमच्या आयुष्यात स्थान मिळत नाही Suicide of a woman in the house of a former Congress minister, wrote in a suicide note I do not find a place in your life

    काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या घरात महिलेची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिले मला तुमच्या आयुष्यात स्थान मिळत नाही

    मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या शाहपूरा परिसरात असलेल्या माजी मंत्री आणि काँग्रेस नेते उमंग सिंघार यांच्या बंगल्यात एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या महिलेने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. Suicide of a woman in the house of a former Congress minister, wrote in a suicide note I do not find a place in your life


    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या शाहपूरा परिसरात असलेल्या माजी मंत्री आणि काँग्रेस नेते उमंग सिंघार यांच्या बंगल्यात एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या महिलेने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे.

    सोनिया भारद्वाज असे या ३९ वर्षीय महिलेचे नाव आहे. त्या हरियाणाच्या अंबाला येथील बालदेव नगर येथील रहिवासी आहे. तिच्या पतीचं नाव संजीव कुमार असं आहे. मयत महिला भोपाळमध्ये माजी मंत्री उमंग सिंघार यांच्या शाहपूर येथील बंगल्यात राहत होती. रविवारी या महिलेने गळफास घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपवली.



    या महिलेच्या पर्समध्ये सुसाईड नोट आढळली. त्यात म्हटले आहे की, मला तुमच्या आयुष्यात स्थान हवं होतं. आता मला सहन होत नाही. राग खूप येतो पण उत्तर मिळत नाही.
    सोनिया यांनी आपल्या मुलाला उद्देशून म्हटले आहे की, तू मला आवडतोस, परंतु मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. आय लव्ह यू. मी माझ्या मजीर्ने आत्महत्या करत आहे असं त्यात म्हटलं आहे.

    या महिलेचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी हॉस्पिटलला पाठवण्यात आला आहे. मागील २५ दिवसांपासून ही महिला या बंगल्यात राहत होती. माजी मंत्री उमंग सिंघारही आत्महत्येच्या २ दिवसापर्यंत बंगल्यातच राहत होते. तपासानंतरच या महिलेचे आणि माजी मंत्री उमंग सिंघार यांच्यात काय संबंध होते? याबाबत खुलासा होऊ शकतो.

    या प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश भदौरिया म्हणाले की, महिलेचे पतीसोबत काही वाद सुरू होते. या महिलेला १८ वषार्चा एक मुलगाही आहे. उमंग सिंघार यांनी त्यांच्या मतदारसंघात जावं असं या महिलेला वाटत नव्हतं. परंतु ते २-३ दिवसांपूर्वीच मतदारसंघात गेले होते. तर उमंग सिंघार म्हणाले की, मी स्वत: हैराण आहे. ती माझी चांगली मैत्रीण होती. तिने असं का केलं? सांगता येणार नाही.

    Suicide of a woman in the house of a former Congress minister, wrote in a suicide note I do not find a place in your life

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप