सुहासला या प्रकारात पहिले मानांकन मिळाले होते Suhas Yathiraj
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :Suhas Yathiraj पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी आज अप्रतिम कामगिरी केली आहे. भारताला बॅडमिंटनमध्ये एकाच दिवसात 4 पदके मिळाली आहेत. सुहास यथीराजने पुरुष एकेरी SL4 प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे. Paralympics 2024 Indias 12th medal Suhas Yathiraj won silver in badminton
अंतिम फेरीत त्याला फ्रान्सच्या लुकास माझूरविरुद्ध २१-९, २१-१३ असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचे हे एकूण 12 वे आणि बॅडमिंटनमधील चौथे पदक आहे. सुहासला या प्रकारात पहिले मानांकन मिळाले होते, पण सुवर्णपदकाच्या लढतीत त्याला निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले होते.
गेल्या वेळी इतिहासाची पुनरावृत्ती झाली. सुहास यथीराजने गेल्या वेळी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पुरुष एकेरी SL4 प्रकारातही रौप्यपदक जिंकले होते. विशेष म्हणजे टोकियो पॅरालिम्पिकच्या अंतिम फेरीतही त्याला फ्रान्सच्या लुकास मजूरकडून पराभव स्वीकारावा लागला होता. सुहास यथीराजचे हे सलग दुसरे पॅरालिम्पिक पदक आहे.
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये, भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिने R2 महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. यानंतर मोना अग्रवालने या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. मोना अग्रवालने महिलांच्या 100 मीटर शर्यतीत (T35) पदक जिंकले. अवनी लेखरा आणि मोना अग्रवाल यांच्यानंतर प्रीती पालने भारताला तिसरे पदक मिळवून दिले.
त्याचवेळी मनीष नरवालने भारताला चौथे पदक मिळवून दिले. मनीष नरवालने 10 मीटर एअर पिस्तूल (SH1) मध्ये रौप्य पदक जिंकले. तर रुबानी फ्रान्सिसने भारताला पाचवे पदक मिळवून दिले. प्रीती पालने सहावे पदक, निषाद कुमारने सातवे आणि योगेश कथुनियाने आठवे पदक जिंकले. नितीश कुमारने बॅडमिंटनमध्ये 9वे पदक जिंकले. यानंतर बॅडमिंटनमध्येच तुलसीमाथी मुरुगेसन हिने 10वे तर मनीषा रामदासने भारतासाठी 11वे पदक जिंकले आहे. आता सुहास यथीराजने भारताचे 12वे पदक जिंकले आहे. Suhas Yathiraj
Paralympics 2024 Indias 12th medal Suhas Yathiraj won silver in badminton
महत्वाच्या बातम्या
- Manipur : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, गोळीबारात महिलेसह 2 ठार, 9 जण जखमी; ड्रोनमधून बॉम्ब टाकल्याचा दावा
- Congress : जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा बोलबाला, पण त्यांच्यापेक्षा काँग्रेसकडेच इच्छुकांचा धावा!!; वाचा संख्या!!
- Maharashtra heavy rain : महाराष्ट्रात पुढील 4 पावसाचा इशारा, मराठवाडा, विदर्भासह अनेक भागांत मुसळधार पाऊस; संभाजीनगर, जळगावला ऑरेंज
- Manoj Jarange : महायुती + महाविकास आघाडीतल्या नाराजांना जरांगेंच्या उमेदवारीचे दरवाजे सध्यातरी बंद!