विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्मारकाच्या जागेवरून मोदी सरकारशी वाद घालण्यासाठी काँग्रेसला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा उमाळा आला. नरसिंह राव यांच्या पार्थिवाचा अपमान करणाऱ्या काँग्रेसने मनमोहन सिंग यांच्या पार्थिवा वरील अंतिम संस्कार यमुना किनारी राजघाट परिसरात विशिष्ट जागेतच व्हावेत, असा आग्रह धरून तिथेच स्मारक बांधण्याचा हट्ट चालविला. त्या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारशी पत्रव्यवहार केला. मोदी सरकारने खर्गे यांना पत्र लिहून स्पष्ट उत्तर दिल्यानंतर काँग्रेसने वाद घालायला सुरुवात केली.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी निश्चित दिल्लीमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येईल, पण त्यासाठी ट्रस्ट वगैरे स्थापन करून त्याची कायदेशीर कार्यवाही करावी लागेल. त्यासाठी वेळ लागेल. परंतु त्यांच्या पार्थिवावरचे अंतिम संस्कार आणि धार्मिक विधी निगम बोध घाट येथे व्हावेत, अशी सूचना केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने केली. त्या संदर्भातली सविस्तर नोट मंत्रालयाने काँग्रेस अध्यक्षांना पाठवली. ही नोट मिळताच काँग्रेसने वाद घालायला सुरुवात केली.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटर हँडलवर संताप व्यक्त केला. मोदी सरकार देशाच्या पहिल्या शीख पंतप्रधानाचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मनमोहन सिंग यांच्यासारख्या जागतिक कीर्तीच्या अर्थशास्त्रज्ञ पंतप्रधानांच्या स्मारकासाठी केंद्र सरकारला दिल्लीत यमुनाकाठी योग्य जागा सापडू नये, याविषयी रमेश यांनी “आश्चर्य” व्यक्त केले!!
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी निश्चित दिल्लीमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येईल, पण त्यासाठी ट्रस्ट वगैरे स्थापन करून त्याची कायदेशीर कार्यवाही करावी लागेल. त्यासाठी वेळ लागेल. परंतु त्यांच्या पार्थिवावरचे अंतिम संस्कार आणि धार्मिक विधी निगम बोध घाट येथे व्हावेत, अशी सूचना केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने केली. त्या संदर्भातली सविस्तर नोट मंत्रालयाने काँग्रेस अध्यक्षांना पाठवली. ही नोट मिळताच काँग्रेसने वाद घालायला सुरुवात केली.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटर हँडलवर संताप व्यक्त केला. मोदी सरकार देशाच्या पहिल्या शीख पंतप्रधानाचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मनमोहन सिंग यांच्यासारख्या जागतिक कीर्तीच्या अर्थशास्त्रज्ञ पंतप्रधानांच्या स्मारकासाठी केंद्र सरकारला दिल्लीत यमुनाकाठी योग्य जागा सापडू नये, याविषयी रमेश यांनी “आश्चर्य” व्यक्त केले!!.
suggesting that the cremation of the former Prime Minister, Dr Manmohan Singh
महत्वाच्या बातम्या
- Dr Manmohan Singh : नरसिंह राव शिष्य डॉ. मनमोहन सिंग कालवश; आर्थिक सुधारणांचा महान कार्यवाहक!!
- ISRO’s : अंतराळात पालक उगवण्याची तयारी; इस्रोचे स्पॅडेक्स पेशी घेऊन जाणार, 30 डिसेंबरला लाँचिंग
- Pakistani : पाकिस्तानी शस्त्रास्त्रांचा पाच राज्यांमधून ईशान्येकडे पुरवठा:सुगावा लागताच भारतीय तपास संस्था सतर्क
- Maken : माकन म्हणाले- केजरीवाल देशाचे फ्रॉड किंग:त्यांना फर्जीवाल म्हणणे योग्य; लोकसभेत आपसोबत युती ही आमची चूक होती