• Download App
    2000 नोटा बदलण्यासाठी पुरेसा वेळ, धावपळीची गरज नाही; रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचा निर्वाळा Sufficient time to exchange 2000 notes, no rush required

    2000 नोटा बदलण्यासाठी पुरेसा वेळ, धावपळीची गरज नाही; रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचा निर्वाळा

    वृत्तसंस्था

    मुंबई : रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा मागे घेतल्या असल्या तरी त्या बदलून घेण्यासाठी नागरिकांना पुरेशी वेळ दिली आहे. त्यामुळे धावपळ करून बँकांमध्ये घाई गर्दी करण्याची काहीच गरज नाही, असा स्पष्ट निर्वाळा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिला आहे. त्याचबरोबर 2000 रुपयांच्या नोटांच्या चलनाची वैधता रद्द झालेली नाही, याचीही आठवण त्यांनी करून दिली. Sufficient time to exchange 2000 notes, no rush required

    2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत आहे. त्यामुळे घाई गर्दी न करता शांतपणे या नोटा टप्प्याटप्प्याने बदलून घेता येतील. त्याचे नियोजन करावे, असे आवाहन शक्तिकांत दास यांनी बँका आणि नागरिकांना केले आहे.

    आरबीआयने (Demonetisation) नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी बरेच पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत.

    – जनहित याचिका

    बँकांमध्ये ओखळपत्र दाखवल्याविना 2 हजार रुपयांच्या (Demonetisation) नोटा बदलून देऊ नये अशी मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

    भाजप नेते अश्विनी उपाध्यय यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेनुसार ओळखपत्राशिवाय दोन हजारांच्या नोटा (Demonetisation) बँकेमध्ये बदलून देणे हे तर्कहीन आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 चे उल्लंघन आहे. तसेच, यामध्ये आरबीआय आणि एसबीआयला संबंधित खात्यातच पैसे जमा करण्याचे निर्देश देण्यात यावे. भ्रष्टाचार आणि अवैध मालमत्ता, उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असणाऱ्या लोकांविरधोत योग्य कारवाई करण्यात यावी, असे निर्देश देण्याची मागणी देखील या याचिकेमध्ये करण्यात आली आहे.



    भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केल्यानंतर बँकांना नोटा बदलण्यासाठी योग्य ती तयारी करता यावी यासाठी विशेष वेळ देण्यात आला आहे. त्यानुसार 23 मे मंगळवारपासून नागरिकांना बँकेत जाऊन नोटा बदलता येतील. त्यासाठी कोणत्याही ओळखपत्राशिवाय नागरिकांना नोटा बदलून देण्याचे पत्र एसबीआयने त्यांच्या सर्व मुख्य कार्यलायांना पाठवले होते. आरबीआयने हा निर्णय जाहीर केल्यानंतर नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यामुळे नागरिकांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी बँकांकडून वेळोवेळी नियमावली जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे स्टेट बँकेसोबत इतर सर्व बँका या नियमाचे पालन करतील, अशी माहिती देखील मिळाली होती. परंतु आता याच विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

    आरबीआयने नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी बरेच पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. तसेच याबाबत आरबीआयकडून कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाही आहेत. आरबीआयने बँकांना नियम बनवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तसेच तुम्ही एका वेळी 2000 नोटा या 20000 पर्यंत बदलू शकता. हे पैसे तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यात जमा करू शकता किंवा बँकेतून नोटा बदलून घेऊ शकता. त्यामुळे नागरिकांनी गोंधळून न जाण्याचे आवाहन रिझर्व्ह बँकेने केले आहे.

    Sufficient time to exchange 2000 notes, no rush required

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य