• Download App
    सुदर्शन पटनायक यांनी पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर बनवला वाळूचा सर्वात मोठा दिवा आणि भगवान रामाची प्रतिमा !|Sudarshan Patnaik made the biggest sand lamp and image of Lord Rama on Puri beach

    सुदर्शन पटनायक यांनी पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर बनवला वाळूचा सर्वात मोठा दिवा आणि भगवान रामाची प्रतिमा !

    • या भव्य कलाकृतीसाठी त्यांनी सुमारे पाच टन वाळू वापरली आहे.

    विशेष प्रतिनिधी

    दिवाळीच्या निमित्ताने प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिशातील पुरी येथे ‘हॅपी दिवाळी’ संदेशासह भगवान रामाची सर्वात मोठी प्रतिमा आणि दिवा तयार केला आहे.Sudarshan Patnaik made the biggest sand lamp and image of Lord Rama on Puri beach



    वाळू कलाकार सुदर्शन यांनी हातावर मातीचा दिवा असलेली श्रीरामाची प्रतिमा व मोठा दिवा अशी 50 फूट लांब आणि 50 फूट रुंद वाळूची कलाकृती तयार केली आहे. यामध्ये त्यांनी सुमारे पाच टन वाळू वापरली. त्यांच्या सँड आर्ट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनीही त्यांना सँड आर्ट बनवण्यासाठी सहकार्य केले.

    दीपावली, प्रकाशाचा सण, प्रामुख्याने 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत त्यांच्या राज्यात परत आल्याबद्दल साजरा केला जातो. प्रभू रामाच्या आशीर्वादाने जानेवारी 2024 मध्ये उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. पटनाईक म्हणाले, म्हणूनच आम्ही यावर्षी रामाची वाळूची मूर्ती बनवली आहे.

    Sudarshan Patnaik made the biggest sand lamp and image of Lord Rama on Puri beach

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    बिहारमध्ये उद्या निकालाच्या दिवशीच “नेपाळ” + “बांगलादेश” घडवायची लालूंच्या पक्षाची तयारी; दमबाजी करणाऱ्या नेत्याविरुद्ध FIR!!

    Air India : एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी; टिश्यू पेपरवर लिहिले- BOMB गूड बाय, वाराणसी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

    Kangana Ranaut : कंगना रणौतवर देशद्रोहाचा खटला चालणार; शेतकरी आंदोलनात रेप-हत्या झाल्याचे म्हटले होते; सुनावणी आग्रा न्यायालयात