विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर चीनमध्ये जाऊन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटून आले असले त्याचबरोबर भारत चीन यांच्या दरम्यान काही विश्वासाची पावले टाकली गेली असली तरी भारताने संरक्षण सिद्धतेमध्ये कुठलीही कमतरता ठेवलेली नाही हे आज भारतीय संरक्षण दलांनी सिद्ध केले. Akash Prime air defence system
लडाख मध्ये तब्बल 15000 फूट उंचीवर भारतीय सैन्य दलाने आकाश एअर डिफेन्स सिस्टीमची चाचणी यशस्वी केली आणि चिनी धोक्याला थेट प्रत्युत्तर दिले.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी चीनला गेले होते तिथे त्यांनी प्रोटोकॉल नुसार चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश त्यांनी शी जिनपिंग यांच्यापर्यंत पोहोचवला. मात्र लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी जयशंकर यांच्या चीन दौऱ्यावर टीकास्त्र सोडले. जयशंकर यांनी भारताचे परराष्ट्र धोरण धुळीला मिळवले. त्यांनी शी जिनपिंग यांच्यापुढे शरणागती पत्करली, वगैरे मुक्ताफळे उधळली.
– पूर्व सीमेवर चाचणी यशस्वी
पण याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलांनी लडाखमध्ये तब्बल 15000 फूट उंचीवर आकाश एअर डिफेन्स सिस्टीमची चाचणी यशस्वी करून दाखवली. भारताच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात डीआरडीओ ने आकाश एअर डिफेन्स सिस्टीम विकसित केली. या डिफेन्स सिस्टीमने नुकत्याच झालेल्या “ऑपरेशन सिंदूर” मध्ये आकाश एअर डिफेन्स सिस्टीमने सर्वोत्तम कामगिरी केली पाकिस्तानी सैन्य दलाने चिनी मिसाईल्स आणि तुर्की ड्रोन्स भारताच्या दिशेने डागली, पण आकाश एअर डिफेन्स सिस्टीमने त्यांना वेळीच रोखून भारताचे नुकसान टाळले. भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तान विरुद्धच्या संघर्षात आकाश एअर डिफेन्स सिस्टीम पश्चिम सीमेवर वापरली, पण आता सैन्य दलांनी लडाख मध्ये तब्बल 15000 फूट उंचीवर चाचणी घेऊन भारताच्या पूर्व सीमेवर वापरायची तयारी केली.
भारतीय सैन्यदलांचे वरिष्ठ अधिकारी आणि डीआरडीओचे वरिष्ठ अधिकारी आकाश एअर डिफेन्स सिस्टीमच्या लडाख मधल्या चाचणीच्या वेळी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच अत्यंत वेगवान ऑब्जेक्शन आकाश एअर डिफेन्स सिस्टीमने इंटरसेप्टट करून पाडले.
successful trials of the indigenously developed Akash Prime air defence system at over 15,000 feet altitude in the Ladakh sector
महत्वाच्या बातम्या
- Bangladesh : बांगलादेशात हिंदू व्यापाऱ्याची दगडाने ठेचून हत्या; कपडे काढून अंगावर नाचले, 5 हल्लेखोरांना अटक
- उल्फाच्या छावणीवर शंभर ड्रोनद्वारे अचूक हल्ला; म्यानमारमध्ये भारतीय लष्कराचा सर्जिकल स्ट्राइक
- Arunachal Pradesh : रेप-छेडछाडीच्या आरोपीची जमावाकडून पोलिस ठाण्याबाहेर हत्या; 20हून अधिक अल्पवयीन मुलींचे शोषण
- Pakistan : पाकिस्तानने म्हटले- भारताने 6 लढाऊ विमाने गमावल्याचे सत्य स्वीकारावे; डोभाल यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर
Rahul Gandhi : राहुल गांधींचे लखनऊ न्यायालयात सरेंडर, 5 मिनिटांनी जामीन; सैन्यावरील टिप्पणीचा खटला