विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तब्बल 12 अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आणि 7000 किलोमीटर पर्यंतची रेंज असणाऱ्या MIRV अग्नि 5 दिव्यास्त्राचे “डीआरडीओ”च्या वैज्ञानिकांनी सफल परीक्षण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः करून ट्विट करून संपूर्ण जगाला ही माहिती जाहीर केली. अर्थातच भारतीय भूमीत घुसखोरी करणाऱ्या चीनला धडकी भरवणारी क्षमता भारतीय वैज्ञानिकांनी कमावली, त्याचा संपूर्ण देशभर आनंद पसरला आहे. Successful test of MIRV 12 nuclear warhead Agni 5 Divyastra
पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी 5.30 वाजता देशाला संबोधित करणार अशी घोषणा दुपारनंतर सोशल मीडियावर फिरू लागली होती. त्यामुळे मोदी देशाला नेमके कोणते सरप्राईज देणार??, याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. मोदींनी यापूर्वी असेच सायंकाळी वेगवेगळ्या वेळी संपूर्ण देशाला संबोधन नोटबंदी कोरोना लॉकडाऊन वगैरे जाहीर केले होते. त्यामुळे मोदी आता नवीन कोणती घोषणा करणार याची देशात उत्सुकता लागून राहिली होती
पंतप्रधान मोदी देशात नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात “सीएए” लागू करण्याची घोषणा करणार का??, ती केल्यास त्याचे काय परिणाम होणार किंवा अन्य कोणते सरप्राईज एलिमेंट मोदींच्या नव्या घोषणेत असणार??, याविषयीची चर्चा वेगवेगळ्या टीव्ही चॅनेलवर रंगली.
परंतु मोदी देशाला संबोधित करण्यासाठी समोर आले नाहीत, तर त्यांनी 5.34 वाजता एक ट्विट केले. त्यामध्ये देशाने MIRV अग्नि 5 आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी केल्याचे त्यांनी नमूद केले. डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. भारताने संरक्षण क्षेत्रांमध्ये केलेल्या या प्रचंड कामगिरीचा पंतप्रधान मोदींनी गौरवपूर्ण शब्दांमध्ये उल्लेख केला.
अग्नि 5 हे संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानातूनच विकसित झालेले आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. ज्याची रेंज तब्बल 7000 किलोमीटर पर्यंत म्हणजे थेट बीजिंग पर्यंत आहे, अर्थातच याचे सफल परीक्षण आधी झाले होतेच. परंतु अग्नि 5 क्षेपणास्त्राचे रूपांतर दिव्यास्त्रात करून म्हणजेच अनेक क्षेपणास्त्रांमध्ये करून एकाच वेळी 12 अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता निर्माण करण्यात आज डीआरडीओचे शास्त्रज्ञ यशस्वी झाले. याच दिव्यास्त्राची चाचणी सफल झाल्याची बातमी पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिली.
MIRV अग्नि 5 फाईव्ह आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारत आता अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या मोजक्याच 5 देशांच्या रांगेत अग्रस्थानी आला आहे. अमेरिका, चीन, रशिया आणि त्यानंतर भारताकडेच एवढ्या मोठ्या प्रमाणावरची रेंज असलेल्या आणि संहारक्षमता असलेल्या क्षेपणास्त्रांची संख्या वाढली आहे.
Successful test of MIRV 12 nuclear warhead Agni 5 Divyastra
महत्वाच्या बातम्या
- बारामतीच्या ज्येष्ठ नागरिक संघात पवारांनी दिली वय वाढल्याची कबुली, पण…!!
- जरांगेंच्या आंदोलनामुळे जेवढी मराठा मतांमध्ये एकजूट, तेवढीच मराठा + इतरांच्या मतांमध्ये फाटाफूट; वाचा आकडेवारी!!
- जम्मू काश्मीर : पुंछमध्ये दहशतवाद्यांचा मोठा कट फसला, 7 आयईडी आणि वायरलेस सेट जप्त
- सावरकरांच्या नाशिक जिल्ह्यात यायला राहुल गांधींना “वायनाड” सापडला; आदित्य आणि पवार येणार साथीला!!