• Download App
    दोन हजार किलोमीटर पल्ल्याच्या अग्नी प्राईमची चाचणी यशस्वी। Successful test of Agni Prime with a range of two thousand kilometers

    दोन हजार किलोमीटर पल्ल्याच्या अग्नी प्राईमची चाचणी यशस्वी

    नवी दिल्ली : डीआरडीओने अग्नी प्राइम या क्षेपणास्त्राची यशस्वीरीत्या चाचमी केली. आण्विक क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र अग्नी मालिकेतील आणखी प्रगत स्वरूपाचे आहे. त्याचा पल्ला एक हजार ते २००० किलोमीटर इतका आहे. Successful test of Agni Prime with a range of two thousand kilometers



    दोन दिवसांपूर्वी ओडीशातील चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावर स्वदेशी बनावटीच्या पिनाका रॉकेटची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली होती. त्यावेळी विविध पल्ला असलेली २५ प्रगत पिनाका रॉकेट यशस्वीरीत्या पाठोपाठ सोडण्यात आली होती. त्यासाठी मल्टी-बॅरल रॉकेट लाँचरचा वापर करण्यात आला होता.

    ओडीशात भुवनेश्वरपासून सुमारे दिडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बेटावरील चाचणी केंद्रावर हे प्रगत क्षेपणास्त्र चाचणीसाठी डागण्यात आले. चाचणी अचूकरीत्या पार पडली. पूर्व समुद्रकिनाऱ्यालगत ठेवण्यात आलेल्या विविध टेलीमेट्री आणि रडार केंद्रांनी चाचणीवर लक्ष ठेवले होते. चाचणी मोहिमेचे सर्व उद्देश अत्यंत उच्च दर्जाच्या अचुकतेसह साध्य करण्यात आल्याचे डीआरडीओने एका निवेदनात म्हटले आहे.

    Successful test of Agni Prime with a range of two thousand kilometers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी